कॅथरिन, 21 ऑक्टोबर : मगर हा असा प्राणी आहे, ज्याला दूरवर पाहूनच भीती वाटते. त्यामुळे मगरीला स्पर्श करणं तर दूरची गोष्ट. आता अशात विचार कर जर मासे पकडायला गेलेल्या व्यक्तीच्या जाळ्यात मगर अडकली तर? विश्वास बसणार नाही ना पण असं खरच घडलं आहे.
ऑस्ट्रेलियामधील एका व्यक्तीसोबत असाच प्रकार घडला. बोटीत बसून मासे पकडत असताना अचानक त्याच्या जाळ्यात मगर अडकली. ऑस्ट्रेलियाच्या कॅथरीन शहराजवळ मासेमारीचे एक प्रसिद्ध ठिकाण आहे. इथं मासेमारीसाठी येणारे लोक मोठ्या संख्येने आहेत. गेल्या सोमवारी त्याच ठिकाणी ट्रेंट डी आपल्या कुटूंबासह बोटींग आणि फिशिंगचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी पोहोचला.
वाचा-OMG! 9 महिन्यांची गर्भवती 5 मिनिटांत धावली 1.6 किमी; पाहा VIDEOवाचा-क्षणात उद्धवस्त करणार शक्तीशाली BRAHMOS सुपरसॉनिक मिसाइल, पाहा VIDEO
नदीचे पाणी गढूळ होते, त्यामुळे मासे दिसत नव्हते. तरी ट्रेंटनं हुक अडकवून मासे पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याचे संपूर्ण कुटुंब बोटीत होते. अचानक जाळं जड झाल्याचे ट्रेंटला वाटले, म्हणून त्यानं जाळं बाहेर काढलं.
वाचा-PPE सूट घालून 'घुंघरू'वर धरला ताल; डॉक्टरच्या भन्नाट डान्सचा VIDEO एकदा पाहाच
ट्रेंट डी आपली हळूहळू जाळं खेचू लागला. जाळ्यात मोठा मासा अडकला म्हणून कुटुंबिय खूश होते. मात्र जाळ्यातून अचानक मगर पाहून सर्वजण थक्क झाले. मगर जाळ्यात अडकल्यामुळे तीला बाहेर काढणार कसे असा प्रश्न होता. ट्रेंटनं जाळं काढण्याचा प्रयत्न केला, मात्र तसे झाले नाही. अखेर मगरीनेच जीव वाचवण्यासाठी ते जाळं कुडतडून टाकलं. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Published by:Priyanka Gawde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.