Home /News /viral /

एका नारळासाठी फळ विक्रेत्यानं मोजले 6 लाख रुपये; कारण जाणून व्हाल थक्क

एका नारळासाठी फळ विक्रेत्यानं मोजले 6 लाख रुपये; कारण जाणून व्हाल थक्क

एका नशीबवान व्यक्तीला जेव्हा मंदिरातील (Temple) नारळ (Special Coconut) मिळवण्याची संधी मिळाली तेव्हा त्यानं 6.5 लाखाची बोली लावत हा नारळ खरेदी करण्याचा निर्णय घेतला

    नवी दिल्ली 12 सप्टेंबर : श्रद्धा आणि विश्वास याला काही सीमा नसते. याच कारणामुळे जेव्हा कर्नाटकातील (Karnataka) एका नशीबवान व्यक्तीला जेव्हा मंदिरातील (Temple) नारळ (Special Coconut) खरेदी करण्याची संधी मिळाली तेव्हा त्यानं 6.5 लाखाची बोली लावत हा नारळ खरेदी करण्याचा निर्णय घेतला. हे मंदीर बगलकोट जिल्ह्यातील जमखंडी येथील चिक्कालकी गावात आहे. नारळ विकत घेणारा व्यक्ती विजयपुरा जिल्ह्यातील टिक्कोटा गावातील फळविक्रेता आहे. 'तिला लवकर घेऊन जा नाहीतर...'; पाठवणीवेळीच मेहुणीची दाजीला अजब धमकी, VIDEO VIRAL द टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, श्री बीलिंगेश्वल यात्रेत श्रावण महिन्यातील शेवटच्या दिवशी मंदीर समितीनं नारळाचा लिलाव केला. यात अनेकांनी भाग घेतली. मात्र, कोणीही फळ विक्रेत्यानं लावली त्या बोलीच्या आसपासही गेलं नाही. भगवान मलिंगराय म्हणजे शिवच्या नंदीचं रूप मानले जातात. त्यामुळे, त्यांच्याजवळ ठेवलेला नारळ त्यांच्या भक्तांसाठी सर्वात खास असतो. हा नारळ खरेदी करण्याचं भाग्य फळफळत. मंदीर समिती बऱ्याच काळापासून या नारळाचा लिलाव करते. मात्र, यासाठी कधीही 10,000 हून अधिकची बोली लागली नाही. मात्र, यंदा ही परिस्थिती भरपूर बदलली. बोली 1000 रुपयांपासून सुरू झाली, लवकरच हा आकजा एक लाखाच्या पार गेला. यानंतर एका भक्तानं तीन लाखाची बोली लावली. मंदीर समितीच्या सदस्यांनी लगेचच ही अंतिम बोली ठरवत लिलाव संपवण्याचा निर्णय घेतला, कारण नारळासाठी याआधी कधीही इतकी बोली लागली नव्हती. मात्र, अखेर फळविक्रेत्यानं दुप्पट रक्कम देत हा नारळ 6.5 लाखाला खरेदी केला. पुलावर स्टंट करणं भोवलं; अचानक तोल गेल्यानं गाडीसह धाडकन कोसळला तरुण, VIDEO मिळालेल्या या रकमेचा वापर मंदिराच्या विकासासाठी आणि इतर धार्मिक कामासांसाठी केला जाणार असल्याचं मंदीर समितीनं सांगितलं. बोली लावलेल्या महावीर या फळविक्रेत्यानं म्हटलं, की भलेही लोक मला वेडा म्हणू किंवा याला अंधश्रद्धा म्हणो. मात्र, माझ्यासाठी ही भक्ती आणि विश्वास होता. त्यांनी सांगितलं, की जेव्हा ते आर्थिक आणि आरोग्यविषयक अडचणींचा सामना करत होते, तेव्हा त्यांनी देवाकडे प्रार्थना केली होती आणि काही महिन्यांतच सगळं काही बदललं. महावीर यांनी सांगितलं, की हा नारळ ते आपल्या घरी ठेवणार आहेत आणि रोज याची पुजाही करणार आहेत.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Karnataka, Viral news

    पुढील बातम्या