मुंबई, 01 जुलै : कधी कधी मजामस्ती, खेळ भयंकर दुर्घटनेत बदलू शकतात. असाच एका धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे
(Shocking video viral). एका कारमध्ये तरुण नको तो खेळ करत होते. हा खेळ त्यांना चांगलाच भारी पडला. मजेमजेत कारमध्ये भयंकर स्फोट झाला. अंगावर काटा आणणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे
(Social media viral video).
कारमध्ये बसून दोन तरुण अशी डेअरिंग दाखवायला गेले, जी त्यांच्याच अंगाशी आली. हिंमत दाखवण्याच्या नादात त्यांच्यासोबत असं काही घडलं की आयुष्यभर ते विसरणार नाही. @AwardsDarwin ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे
(crackers get inside car viral video).
व्हिडीओत पाहू शकता एक व्यक्ती कारच्या आत बसली आणि एक बाहेर आहे. कारमध्ये बसलेल्या व्यक्तीच्या हातात फटाके आहेत आणि कारबाहेरील व्यक्ती ते फटाके पेटवते आहे. जसा फटाके पेटतो तशी ही व्यक्ती तो फटाका कारबाहेर जमिनीवर दूर फेकतो. हा फटाका रॉकेटसारखा दिसतो. काही वेळ तो तिथं जमिनीवर पेटतो आणि पुन्हा उडत थेट कारमध्ये घुसतो. त्यानंतर कारमध्ये स्फोट होतो. हा व्हिडीओ पाहूनच आपल्याला धडकी भरते
(Man burning crackers inside car video).
हे वाचा - बापरे! बुल्डोझरला लटकून गरागरा फिरताना फुटली कवटी, कॅमेऱ्यात कैद झाली भयंकर दुर्घटना; VIDEO VIRAL
यानंतर पुढे नेमकं काय झालं ते समजलं नाही. पण व्हिडीओतील दृश्यावरून भयंकर स्फोट झाल्याचं दिसतं आणि ते पाहून हे लोक गंभीररित्या जखमी झाले असावेत, असंच वाटतं.
व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. फटका परत कारमध्ये कसा आला, याचं आश्चर्य एका युझरने व्यक्त केलं आहे. तर एकाने कारमधील व्यक्तीने फटाका फेकताच कारचा दरवाजा बंद केला असतं तर बरं झालं असतं, असा सल्ला दिला आहे. तर एकाने आपल्याला व्हिडीओ पाहून हसू आल्याचंही म्हटलं आहे.
हे वाचा - याला चमत्कार म्हणावं की नशीब! व्यक्ती चालत असतानाच अचानक कोसळला पूल पण...; Video चा शेवट पाहून हैराण व्हाल
तुम्हाला हा व्हिडीओ पाहून नेमकं काय वाटतं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा. शिवाय तुम्ही फटाके किंवा आगीसोबत असं काही खतरनाक स्टंट करू नका, असं आवाहनही आम्ही तुम्हाला करतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.