नवी दिल्ली 16 नोव्हेंबर : सोशल मीडियावर (Social Media) असे अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत जे पाहून तुम्हीही विचारात पडाल की लोक अशी मस्करी का करतात. मस्करीच्या नादात अनेकदा लोक असा प्रँक (Prank Videos) करतात की समोरच्या व्यक्तीची अवस्था वाईट होते. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल (Video Viral on Social Media) होत आहे. यात पाहायला मिळतं की मालकानं आपल्या कुत्र्याला असं भयानक रूप दिलं की ते पाहूनच लोकांची अवस्था वाईट झाली. कुत्र्याला मालकाने असा कॉस्ट्यूम घातला की ते मोठ्या कोळीप्रमाणे दिसू लागलं.
OMG! महिलेनं भल्यामोठ्या मगरीला मारली मिठी; अंगावर काटा आणणारा VIDEO
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसतं, की एक व्यक्ती आपल्या पाळीव कुत्र्याला अजब कॉस्ट्यूम घालतो. हा कॉस्ट्यूम घातल्यानंतर कुत्रा एखाद्या भयानक मोठ्या कोळीप्रमाणे दिसत आहे.
विशेष बाब म्हणजे कुत्र्याचा रंगही काळा आहे. त्यामुळे हा रंगही त्याच्या कॉस्ट्यूमसोबत मॅच होत आहे. कुत्र्याच्या मालकानं सुनसान जागेत कुत्र्याला सोडलं. यानंतर कुत्र्याला पाहताच लोकांचा अवस्था वाईट झाली.
VIDEO : सासरी आलेल्या वहिनीच्या मांडीवर जाऊन बसला अन्.., पाहा दिराचा प्रताप
फेसबुक अपलोड करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये अनेक क्लिप्स आहेत. पहिल्या क्लिपमध्ये दिसतं की एक व्यक्ती बाहेर उभा आबे. इतक्यात कुत्रा कोळीच्या रूपात बाहेर येतो. हे पाहताच हा व्यक्ती घाबरतो आणि पळ काढतो. पुढच्या क्लिपमध्ये दिसतं की हा कुत्रा लिफ्टमध्ये आपल्या मालकासोबत असतो. मालक जमिनीवर झोपून मरण्याचं नाटक करतो आणि इतक्यात तिथे दोन मुली येतात. कुत्र्याला कोळीच्या कॉस्ट्यूममध्ये पाहून त्या प्रचंड घाबरतात आणि तिथून पळ काढतात. हा व्हिडिओ पाहताना जरी मजेशीर वाटत असला तरी अशा परिस्थितीत कोणालाही धडकी भरू शकते. फेसबुकवर हा व्हिडिओ Hilarious Ted ने शेअर केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Funny video, Shocking video viral