मराठी बातम्या /बातम्या /Viral /

रस्त्यावर तडफडत होतं झुरळ; त्याला वाचवण्यासाठी तरुणाने थेट गाठलं हॉस्पिटल

रस्त्यावर तडफडत होतं झुरळ; त्याला वाचवण्यासाठी तरुणाने थेट गाठलं हॉस्पिटल

कुत्रा, मांजर नाही तर चक्क एका झुरळाला वाचवण्यासाठी (Man brought injured cockroach to hospital) त्याने धडपड केली.

कुत्रा, मांजर नाही तर चक्क एका झुरळाला वाचवण्यासाठी (Man brought injured cockroach to hospital) त्याने धडपड केली.

कुत्रा, मांजर नाही तर चक्क एका झुरळाला वाचवण्यासाठी (Man brought injured cockroach to hospital) त्याने धडपड केली.

बँकॉक, 08 जून: रस्त्यावर एखादं जखमी प्राणी किंवा पक्षी दिसला की काही लोक त्यांना घेऊन प्राण्यांच्या रुग्णालयात जातात. यामध्ये शक्यतो मांजर, कुत्रा, कबुतर, कावळा, चिमणी इत्यादी पशूपक्ष्यांचा समावेश असतो. पण कधी कोणत्या कीटकाला कुणी रुग्णालयात घेऊन गेल्याचं ऐकलं आहे का? तेसुद्धा झुरळ (Man saved cockroach).

जे झुरळ आपल्या घरात दिसताच आपल्याला किळसवाणं वाटतं. त्यांना आपण मारतो. अशा झुरळाचा तेसुद्धा रस्त्यावर सापडलेलं झुरळ... त्याचा जीव वाचवण्यासाठी एका व्यक्तीने मात्र धडपड केली. या जखमी झुरळाला घेऊन या व्यक्तीने रुग्णालय गाठलं (Man brought a cockroach to hospital).

सर्वांसाठी हास्यास्पद वाटेल असं कृत्य करणाऱ्या या व्यक्तीची गोष्ट नुकतीच थायलंडमधल्या (Thailand) एका पशुवैद्याने (Veterinary Doctor) फेसबुकवर शेअर केली आहे. थायलंडमधल्या क्राथुम बैन या भागातल्या थानू लिम्पापट्टानावानिच या नावाच्या पशुवैद्याने आपल्या बाबतीत घडलेला हा प्रसंग शेअर केला आहे.

हे वाचा - हुश्शार कावळा! मांजराची फजिती करून तिच्या तोंडचा घासही पळवला; पाहा VIDEO

या डॉक्टरकडे अलिकडेच एक व्यक्ती चक्क एका झुरळाला (Cockroach) उपचारांसाठी घेऊन आली होती. त्या व्यक्तीला ते झुरळ रस्त्याकडेला पडलेलं दिसलं होतं. त्यावर चुकून कोणा माणसाचा पाय पडला होता. त्यामुळे ते जखमी झालं होतं.

डॉ. थानू यांनी सांगितलं, त्या व्यक्तीने ते झुरळ जखमी अवस्थेत रस्त्याकडेला पाहिलं आणि त्याला तसंच तडफडत ठेवून पुढे जाणं त्याला पटलं नाही. त्यामुळे त्या व्यक्तीने झुरळाला तळहातावर घेतलं आणि ती सै रॅक अॅनिमल हॉस्पिटलमध्ये आली.

आपल्याकडे कोणी तरी झुरळाला घेऊन येण्याची ही पहिलीच वेळ होती, असं त्यांनी सांगितलं पण त्यांनी त्याला वेड्यात काढलं नाही. ते झुरळ जगण्याची शक्यता 50 टक्के होती. तरीही त्यांनी त्याच्यावर तातडीने उपचार केले. झुरळाला आणणाऱ्या त्या व्यक्तीप्रमाणेच डॉक्टरही संवेदनशील मनाचे असल्याने त्यांच्याकडून अशी कृती घडली. त्या उपचारांसाठी त्यांनी त्या व्यक्तीकडून शुल्कही घेतलं नाही.

त्यांनी आव्हान स्वीकारलं आणि त्याला ऑक्सिजनेटेड कंटेनरमध्ये ठेवलं. त्यापेक्षा फार काही वेगळं आपण करू शकत नव्हतो; मात्र त्यातून त्याची जगण्याची शक्यता वाढू शकेल, या उद्देशाने तसं केल्याचं डॉ. थानू यांनी लिहिलं आहे. उपचारांनंतर डॉक्टरनी ते झुरळ त्या व्यक्तीकडे परतही दिलं.

हे वाचा - काठीऐवजी तरुणीने हातानेच पकडला भलामोठा साप; पुढे जे घडलं ते पाहून उडेल थरकाप

डॉ. थानू यांनी लिहिलं आहे, 'हा जोक नाही. निसर्गातल्या प्रत्येक जिवाकडे सहवेदनेने आणि दयाळूपणे पाहण्याची त्या व्यक्तीची प्रवृत्ती कौतुकास्पद आहे. अशा प्रकारचे आणखी बरेच लोक या जगात असायला हवेत, अशी इच्छा मी व्यक्त करतो. दयाळूपणाचा जगाला आधार आहे.'

नंतर ते झुरळ जगलं की मेलं याबद्दलची माहिती या डॉक्टरनी लिहिलेली नाही. मात्र एका छोट्याशा आणि एरव्ही उपद्रवी म्हणून मारल्या जाणाऱ्या जिवाविषयीही एवढी संवेदनशीलता दाखवणारी ती व्यक्ती आणि हे डॉक्टर या दोघांचंही सोशल मीडिया युझर्सनी कौतुक केलं. या डॉक्टरांची पोस्ट व्हायरल झाली.

First published:

Tags: Lifestyle, Other animal, Thailand