Home /News /viral /

बापरे! दगड नाही तर डोक्याने फोडला नारळ; या व्यक्तीचा कारनामा पाहून घालाल तोंडात बोटं, VIDEO

बापरे! दगड नाही तर डोक्याने फोडला नारळ; या व्यक्तीचा कारनामा पाहून घालाल तोंडात बोटं, VIDEO

हा व्यक्ती आपल्या डोक्याने नारळ फोडताना दिसत आहे (Man Breaking Coconut with Head) आणि तेदेखील नारळ हवेमध्ये उडवून.

  नवी दिल्ली 05 डिसेंबर : भारतीय लोकांमध्ये अतिशय वेगवेगळं टॅलेंट असतं. हे टॅलेंट दाखवण्याची संधी अनेकांना कधी ना कधी मिळतेच. आजकाल तर लग्नाचा सिझन (Wedding Season 2021) सुरू आहे. यामुळे लोकांना आपलं टॅलेंट दाखवण्यासाठी हीच सर्वोत्तम जागा वाटत आहे. यामुळे हे लोक इथेच आपली कला दाखवू लागतात आणि विशेष म्हणजे लग्नात आलेले पाहुणेही त्यांना साथ देत उत्साह वाढवतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Video Viral on Social Media) होत आहे. यात एक व्यक्ती अतिशय अनोखा कारनामा करताना दिसतो तर आजूबाजूचे लोक त्याला प्रोत्साहन देत आहेत. यात हा व्यक्ती आपल्या डोक्याने नारळ फोडताना दिसत आहे (Man Breaking Coconut with Head) आणि तेदेखील नारळ हवेमध्ये उडवून. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की मागे लग्नमंडप आहे आणि समोरच एक व्यक्ती हातात नारळ घेऊन उभा आहे. नारळ हवेत फेकण्यासाठी तो तयार आहे. यादरम्यान त्याच्या आसपास अनेक लोक उपस्थित आहे. व्हिडिओमध्ये दिसतं की अचानक हा व्यक्ती नारळ हवेत वरती फेकतो आणि आपला डोक्याने हा नारळ फोडतो. या व्यक्तीच्या डोक्याच्या मजबूतीचा अंदाज तुम्ही यावरुनच लावू शकता की नारळ त्याच्या डोक्यात पडताच नारळाचे अनेक तुकडे होतात. हा व्हिडिओ लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Jumma Khan (@jumma8756)

  इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ jumma8756 नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. आतापर्यंत 9.5 मिलियन म्हणजेच 95 लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तर 7 लाखाहून अधिकांनी व्हिडिओ लाईक केला आहे. लोक या व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंटही करत आहेत. या कमेंट वाचून तुम्हालाही हसू येईल. एका यूजरने डोक्यावर नारळ फोडणाऱ्या या व्यक्तीला ‘रोनाल्डो ज्यूनिअर’ म्हटलं आहे. तर आणखी एका यूजरने यावर कमेंट करत म्हटलं, ‘वाह बेटे मौज कर दी’. तर एका यूजरने कमेंट करत विचारलं की हा माणूसच आहे का. इतरही अनेकांनी या व्हिडिओवर मजेशीर कमेंट केल्या आहेत.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Shocking video viral, Viral video on social media

  पुढील बातम्या