मराठी बातम्या /बातम्या /Viral /

बापरे बाप! तरुणाने हवेत उडवली लक्झरी कार; खतरनाक STUNT VIDEO पाहताच पोलीसही त्याच्या शोधात

बापरे बाप! तरुणाने हवेत उडवली लक्झरी कार; खतरनाक STUNT VIDEO पाहताच पोलीसही त्याच्या शोधात

प्रसिद्धीसाठी तरुणाचा खतरनाक जीवघेणा कार स्टंट.

प्रसिद्धीसाठी तरुणाचा खतरनाक जीवघेणा कार स्टंट.

प्रसिद्धीसाठी तरुणाचा खतरनाक जीवघेणा कार स्टंट.

  • Published by:  Priya Lad

वॉशिंग्टन, 23 मार्च : बाईक, कार स्टंटचे बरेच व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. काही लोकांना तर स्टंट आणि प्रसिद्धीचं इतकं वेड असतं की त्यावेळी त्यांना ना आपल्या महागड्या वस्तूची, ना आपल्या अनमोल जीवाची पर्वा असते. ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. असाच एक खतरनाक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे (Car in air).

एका तरुणाने आपली लक्झरी कार हवेत उडवली आहे. व्हिडीओत पाहू शकता एक भरधाव लक्झरी कार येते आणि हवेत उडते. त्यानंतर ती धाडकन जमिनीवर आदळते. तेव्हाच ती इतर दोन गाड्यांनाही धडकते. अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील कारचा हा व्हिडीओ आहे. लॉस इंजिल्समधील इको पार्कजवळ हे दृश्य आहे.

20 मार्चला या कारमधील तरुणाने हा प्रताप केला. हा व्हिडीओ पोलिसांपर्यंत पोहोचला. त्यानंतर पोलीस या तरुणाला शोधत आहेत.

हे वाचा - VIDEO - माणसं फक्त तमाशा पाहत राहिली; अखेर एका गाईनेच श्वानाला हैवानाच्या तावडीतून सोडवलं

पोलिसांनी सोशल मीडियावर हा व्हिडीओ पोस्ट केला आणि जो कुणी या कार स्टंट करणाऱ्याबाबत माहिती देईल, त्याला 1 डॉलर म्हणजे 76 हजार रुपये बक्षीस जारी केलं.

दरम्यान हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या स्टंटमागे असलेल्या आरोपीचा शोध आता संपला आहे. यामागे प्रसिद्ध टिकटॉक स्टार डोमिनिक्स जेग्लाइटिस उर्फ डर्टे डोम असल्याचा दावा करण्यात आला आहे.

हे वाचा - VIDEO - भुकेल्या वाघाचा बाईकस्वारावर खतरनाक हल्ला; शिकारीचं भयानक दृश्य कॅमेऱ्यात कैद

जेग्लाइटिसने एका टिकटॉक व्हिडीओच्या ऑनस्क्रीन टेक्स्टमध्ये आपण आताच आपली नवी टेस्ला क्रॅश केल्याचं म्हटलं आहे. सध्या हा व्हिडीओ टिकटॉकवरून हटवण्यात आला आहे. ही गाडी घटनास्थळीच सोडण्यात आली होती. एका व्हिडीओत जेग्लाइटिसने आपण ही गाडी नशेत चालवल्याचं म्हटलं आहे.

First published:

Tags: Car, Stunt video, Viral, Viral videos