@oynatbakim या ट्विटर अकाऊंटवर एका पेट्रोलपंपावरील हा व्हिडीओ आहे. व्हिडीओत पाहू शकता काही बाईक या पेट्रोलपंपावर उभ्या आहेत. हे वाचा - पर्यटकांसह आकाशात झेपावताच क्रॅश झाला Hot Air Balloon; भयंकर दुर्घटनेचा VIDEO एक बाईक पुढे सरकते आणि बाईकचा तोल ढासळून ती घसरते. बाईकचं पुढचं चाकच वर होतं आणि तरुण धाडकन जमिनीवर आपटतो. तरुण तसाच उठतो, बाईक हातात धरतो पण दुसऱ्याच क्षणी तो जे काही करतो ते धक्कादायक आहे. तरुणाला आपण पडल्यानंतर उठतो खरा पण तो तसाच मागे फिरून आपल्या मागे असलेल्या बाईकस्वार तरुणावर आपली बाईक चढवतो. तो तरुणही आपल्या बाईकसह कोसळतो. हे वाचा - कारसोबत रेस लावणं तरुणाला भोवलं; बाईकसह हवेत उडाला अन्..., पाहा Shocking Video एकंदर व्हिडीओ पाहताच एकतर या तरुणाला तो पडला याचा राग सहन झाला नाही किंवा तो पडल्यानंतर त्याच्या मागील तरुण त्याला हसला असावा म्हणून त्याने रागात असं केलं असावं. किंवा त्या मागील तरुणाने आपल्या बाईकला धक्का दिला म्हणून आपली बाईक घसरली आणि आपण पडलो, असं त्याला वाटत असावं. पण व्हिडीओ पाहिल्यानंतर खरंतर मागील बाईकस्वार तरुणाची यात काहीच चूक नसल्याचंही दिसतं आहे.😂😂😂 pic.twitter.com/suVNRmlSY5
— oynat bakim (@oynatbakim) October 12, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Accident, Bike accident, Bike riding, Viral, Viral videos