• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • OMG! एक-दोन नाही डझनभर महाकाय अजगरांनी घातला विळखा; हा खतरनाक VIDEO पाहताना जरा जपून

OMG! एक-दोन नाही डझनभर महाकाय अजगरांनी घातला विळखा; हा खतरनाक VIDEO पाहताना जरा जपून

हा व्हिडीओ पाहून धडकीच भरेल.

 • Share this:
  वॉशिंग्टन, 24 सप्टेंबर : साधा छोटा साप (Snake video) पाहिला तरी आपल्याला घाम फुटतो. अशात अजगरासमोर (Python video) उभं राहण्याची तर आपण कल्पनाही करू शकत नाही. पण एका व्यक्तीला एक-दोन नव्हे तर तब्बल डझनभर अजगरांनी विळखा घातला (Man sitting between python video). महाकाय अजगरांच्या मध्ये ही व्यक्ती होती (Man with python video). हा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. व्हिडीओतील सापांचा आकार पाहूनच तुम्ही हैराण व्हाल (Shocking video). आतापर्यंत फिल्ममध्ये इतके मोठे अजगर तुम्ही पाहिले असतील. ज्यांच्यासमोर जाणं तर दूर तसा विचारही आपण करणार नाही. पण या व्यक्तीने तेच करून दाखवलं. त्याने तशी हिंमत केली. त्याच्यासोबत नेमकं काय घडलं पाहा. व्हिडीओत पाहू शकता ही व्यक्ती चक्क महाकाय अजगरांमध्ये मस्ती करत आहे. या भल्यामोठ्या सापांसोबत ती खेळताना दिसते आहे. जमिनीवर आधी काही साप आहेत, त्यांच्यामध्ये ही व्यक्ती अगदी आरामात, बिनधास्तपणे बसली आहे. कॅमेऱ्यासमोर पाहत बोलतानाही दिसते आहे. व्यक्तीच्या डोक्यावरसुद्धा काही अजगर आहेत. ही व्यक्ती बोलत असताना अजगर एखाद्या गोळ्यासारखे त्याच्या डोक्यावर धाडकन कोसळतात. पण तरी ही व्यक्ती बिलकुल घाबरत नाही. पण आपल्याला मात्र तेव्हा धडकी भरते. हे वाचा - गोरिल्लाचं कृत्य पाहून पर्यटक शरमले; आई-वडिलांनी मुलांसह Zoo मधून ठोकली धूम yournaturegram इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला. त्यानंतर तो इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरही व्हायरल होतो आहे. हाच व्हिडीओ याआधीही व्हायरल झाला होता. ज्यातील फक्त 10 सेकंदाचा हा भाग दाखवण्यात आला आहे. द रेप्टाइल झूच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दोन मिनिटांचा हा व्हिडीओ याआधी पोस्ट करण्यात आला होता. या सापांसोबत दिसणाऱ्या व्यक्तीचं नाव जे ब्रुवर (Jay Brewer) असं आहे. कॅलिफोर्नियातील (California) रेप्टाईल झूचा (The reptile Zoo) तो संस्थापक आहे. या व्हिडीओत तो आपण सापांच्या  वजनाखाली अडकल्याचं दाखवतो आणि आता त्याला रात्र या सापांच्या वेढ्यातचा घालवावी लागेल असं सांगतो आणि तोच जोरात ओरडतो की साप खूप धोकादायक आहेत. हे वाचा - बापरे! महाकाय सापाने तरुणाला घातला वेटोळा आणि...; थरकाप उडवणारा VIDEO तो सापांवर खूप प्रेम करतो. तो लहान असल्यापासून स्वतःचं एक भल्यामोठ्या सापांचं संग्रहालय असावं, असं त्याचं स्वप्न होतं हे तो आवर्जून सांगतो.
  Published by:Priya Lad
  First published: