नवी दिल्ली 23 जानेवारी : एका व्यक्तीचं संपूर्ण आयुष्य फॅक्ट्रीमध्ये नोकरी करण्यात जात होतं. सेवानिवृत्तीच्या वयात नाईट शिफ्ट (Night Shift) करून घरी परतत असताना या व्यक्तीला रस्त्यात एक पेपर विकत घेण्याची इच्छा झाली. त्याला याची अजिबातही कल्पना नव्हती की हा पेपरच त्याचं नशीब पालटणार आहे. त्याची नजर पेपरमधील नॅशनल लॉटरीवर पडली आणि काहीच वेळात हा व्यक्ती करोडपती झाला (Man Became overnight Millionaire).
फॅक्ट्रीमध्ये काम करणाऱ्या या व्यक्तीला 2 मिलियन डॉलरची लॉटरी लागली आहे (Factory Worker won Lottery of 2 Millions Dollar). करोडपती बनताच या व्यक्तीने आपल्या मालकाला फोन करून सांगितलं की आता तो कधीच कामावर परत येणार नाही. ही घटना कुम्ब्रियाच्या कार्लिस्ले येथील असून 61 वर्षीय इयान ब्लॅकसोबत घडली आहे. डेली स्टारच्या वृत्तानुसार, इयान पिरेली फॅक्ट्रीमध्ये काम करत होते.
इयान ब्लॅक यांनी कामावरून परतताना एक पेपर खरेदी केला. याचदरम्यान त्यांची नजर नॅशनल लॉटरीवर पडली आणि त्यांनी एक स्क्रॅच कार्ड खरेदी केलं. इयान ब्लॅक यांना जेव्हा समजलं की त्यांना लॉटरी लागली आहे, तेव्हा त्यांना प्रचंड आनंद झाला. इयानने घरी जाऊन आपली पत्नी सँड्राला हे तिकिट क्रॉसचेक करण्यास सांगितलं. 61 वर्षाच्या इयान ब्लॅकला 2 मिलियन डॉलर म्हणजेच 14 कोटी रूपयांची लॉटरी लागली होती. या वृद्ध दाम्प्त्याने याआधी कधीही इतके पैसे एकसोबत पाहिले नव्हते.
लॉटरी कन्फर्म होताच इयान ब्लॅक यांनी फॅक्टरीच्या मालकाला फोन करून सांगितलं की इथून पुढे ते कामावर येणार नाहीत. हे ऐकताच फॅक्ट्रीचा मालक आश्चर्यचकित झाला आणि म्हटला, का? नक्की काय झालं? यावर इयानने सांगितलं की त्यांनी 2 मिलियन डॉलरची लॉटरी जिंकली आहे. कपलचं असं म्हणणं आहे, की या पैशांनी ते आपल्या पाळीव श्वानाचं ऑपरेशन करणार आहेत आणि मग जमीन खरेदी करून आपल्या स्वप्नातील घर बांधणार आहेत. त्यांना 5 मुलं आणि दहा नातवांडं आहेत. इयान ब्लॅकचं असं म्हणणं आहे, की ही फक्त त्यांचंच नाही तर संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य बदलणारी घटना आहे.
Published by:Kiran Pharate
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.