VIDEO : दुकानाबाहेर सामान ठेवण्यावरून झाला वाद, तरुणानं वृद्धाला लोखंडी रॉडनं केली मारहाण

VIDEO : दुकानाबाहेर सामान ठेवण्यावरून झाला वाद, तरुणानं वृद्धाला लोखंडी रॉडनं केली मारहाण

केवळ दुकानाबाहेर सामान ठेवलं यावरून वाद झाला आणि काय झालं पाहा VIDEO

  • Share this:

गाझियाबाद, 20 सप्टेंबर : दोन दिवसांपूर्वी भररस्त्यात महिलेला मारहाण झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पुन्हा एकदा भयंकर प्रकार समोर आला आहे. तरुणानं वृद्धाला लोखंडी रॉडने भररस्त्यात मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार या वृद्ध व्यक्तीच्या दुकानाबाहेर सामान ठेवणाऱ्यावर आवाज चढवला आणि आरोपीनं या वृद्ध व्यक्तीला लोखंडी रॉडनं बेदम मारहाण केली आहे. स्थानिकांनी या घटनेदरम्यान बघ्याची भूमिका घेत आपल्या मोबाईलमध्ये हा संपूर्ण प्रकार कैद केला आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला ताब्यात घेतलं आहे.

हे वाचा-काय सांगता? इथे हत्तीला द्यावा लागतो टॅक्स...नेमका काय आहे प्रकार पाहा VIDEO

केवळ दुकानाबाहेर सामान ठेवलं यावरून वाद झाला आणि वृद्धाला बेदम मारहाण करण्यात आली. याआधी गाझियाबादमध्ये मंगळवारी एका महिलेनं छेड काढणाऱ्या व्यक्तीला टोकल्याच्या रागातून या महिलेला भररस्त्यात बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केल्याची घटना समोर आली होती. आरोपीने डोक्यात खुर्ची घालून महिला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केल्याचा घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्याद कैद झाली आणि त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली.

दरम्यान गाझियाबादमध्ये गेल्या काही दिवसांपासून असे प्रकार आणि गुंडगिरी वाढत चालल्यानं पोलीस प्रशासनाचा धाक उरला की नाही असा सवालही स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे. या प्रकरणी व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून सध्या चौकशी सुरू आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: September 20, 2020, 1:03 PM IST

ताज्या बातम्या