• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • 'कुत्रा आणा, पण बाळ नको'; मामानं स्वतःच्याच लग्नात लहानग्या भाच्याला केलं बॅन, काय आहे प्रकरण?

'कुत्रा आणा, पण बाळ नको'; मामानं स्वतःच्याच लग्नात लहानग्या भाच्याला केलं बॅन, काय आहे प्रकरण?

या मामानं आपल्याच लग्नात भाच्याच्या एण्ट्रीवर बॅन लावलं (Groom Bans Nephew at Wedding) . हे समजल्यानंतर बहिणीला राग अनावर झाला

 • Share this:
  नवी दिल्ली 23 सप्टेंबर : आजपर्यंत तुम्ही अनेकदा कंस मामाबद्दल (Kans Mama) ऐकलं आणि वाचलं असेल. या मामानं आपल्याच भाच्याला मारण्याचं ठरवलं होतं. जेव्हा कंसाला समजलं, की त्याचा मृत्यू त्याच्याच बहिणीच्या गर्भातून जन्म घेणार आहे, तेव्हा त्यानं आपल्याच बहिणीच्या मुलांना मारलं. मात्र, आज आम्ही कलयुगातील मामाबद्दल बोलत आहोत. या मामानं आपल्याच लग्नात भाच्याच्या एण्ट्रीवर बॅन लावलं (Groom Bans Nephew at Wedding) . हे समजल्यानंतर बहिणीला राग अनावर झाला, की लग्नात कुत्रे (Dog at Wedding Function) घेऊन जाण्यास परवानगी आहे मात्र लहान मुलं बॅन आहेत. या महिलेनं आपल्या आयुष्यातील ही धक्कादायक घटना (Shocking Incident) ऑनलाईन शेअर केली आहे. तिच्या भावाच्या लग्नात कुत्र्यांना एण्ट्री होती. मात्र, यात लहान मुलांना प्रवेश देण्यास बंदी होती. याच कारणामुळे महिला आपल्याच भावाच्या लग्नात आपल्या सात महिन्यांच्या बाळाला घेऊन जाऊ शकत नव्हती. मिडलँडमध्ये राहणाऱ्या या महिलेनं लोकांसोबत ऑनलाईन साईटवरुन आपलं दुःख शेअर केलं आहे. Mumsnet नावाच्या वेबसाईटवर महिलेनं स्वतः हा अनुभन शेअर केला. बाळाला लग्नात प्रवेश नसल्यानं ती स्वतःही आपल्या भावाच्या लग्नात जाऊ शकली नाही. महिलेनं घरी आणला श्वान; वर्षभरानंतर झाला मोठा खुलासा, डॉक्टरही हैराण बिर्मिंघम लाईव्ह रिपोर्ट्सच्या वृत्तानुसार, महिलेच्या भावाचं लग्न साउथ कोस्टमध्ये होतं. तिथे तिला दिवस दिवस राहावं लागणार होतं. मात्र, महिलेकडे कार नसल्यानं ती आपल्या सात महिन्यांच्या बाळाला सोडून तिथे जाऊ शकत नाही. महिलेनं आपलं हे दुःख ऑनलाईन शेअर करत लिहिलं, तिचा भाऊ डिसेंबरमध्ये लग्न करत आहे. तिला मागील आठवड्यातच आमंत्रण मिळालं. तिनं एप्रिल महिन्यातच बाळाला जन्म दिला आहे, हे माहिती असूनही तिच्या भावानं या कार्डमध्येच स्पष्ट लिहिलं आहे, की लग्नात लहान मुलांना प्रवेश दिला जाणार नाही. म्हणजेच त्यानं आपल्या भाच्यालाही लग्नात येण्यास मनाई केली आहे. मुलावर भिंत कोसळताना दिसताच ढाल बनून उभा राहिली आई; हृदय पिळवटून टाकणारा VIDEO हे वाचल्यानंतर महिलेनं लगेचच इव्हेंट ऑर्गनायझरची वेबसाईट तपासली. यात महिलेनं पाहिलं की या लग्नात कुत्रे घेऊन जाण्यास परवानगी आहे. यानंतर महिलेनं आपल्या भावासोबत बातचीत केली. मात्र, लग्नात लहान मुलं येऊ नये, अशी त्याच्या होणाऱ्या पत्नीचीही इच्छा होती. आता महिलेनं ही घटना ऑनलाईन शेअर केल्यानं अनेकांनी यावर कमेंट केल्या आहेत. अनेकांनी लिहिलं, की हे तिचं खासगी प्रकरण आहे. ती लग्नात जाऊ किंवा न जावो, ही तिची इच्छा आहे. सात महिन्याच्या बाळाला एकट्याला सोडून जाण्याचा सल्ला तिला कोणीही दिला नाही.
  Published by:Kiran Pharate
  First published: