मराठी बातम्या /बातम्या /Viral /

हजारो फूट उंचावर दोरी चालताना तोल गेला आणि आकाशातून खाली कोसळला तरुण; धडकी भरवणारा VIDEO

हजारो फूट उंचावर दोरी चालताना तोल गेला आणि आकाशातून खाली कोसळला तरुण; धडकी भरवणारा VIDEO

सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी आकाशात जीवघेणा स्टंट करत तरुणाने आपला जीव धोक्यात टाकला.

सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी आकाशात जीवघेणा स्टंट करत तरुणाने आपला जीव धोक्यात टाकला.

सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी आकाशात जीवघेणा स्टंट करत तरुणाने आपला जीव धोक्यात टाकला.

  • Published by:  Priya Lad
मुंबई,  10 जुलै :जमिनीपासून काही अंतरावर बांधलेल्या दोरीवर आपला तोल सावरत चालणारी मुलगी किंवा महिला. असा डोंबार्रायाचा खेळ तुम्ही पाहिलाच असेल किंवा सर्कशीत अशा चित्तथरारक कसरती पाहिल्या असतील. प्रत्यक्षात नाही तर किमान फिल्म मध्ये तर तुम्ही हे नक्कीच पाहिलं असेल (Man balancing on thin rope fell down from sky).  जमिनीपासून काही अंतरावरच लोकांना असं काही करताना पाहून आपल्या काळजाचा ठोका चुकतो. विचार करा असं कोणी हजारो फूट उंच आकाशात करण्याचा प्रयत्न केला तर... आपल्याला फक्त कल्पना करूनच धडकी भरली (Stunt in sky video). पण एका व्यक्तीने हे प्रत्यक्षात करण्याचा प्रयत्न केला. हजारो फूट उंचावर ही व्यक्ती दोरीवर चालू लागली. हा स्टंट करण्याच्या नादात नको तेच घडलं. या व्यक्तीचा पाय घसरला, तिचा तोल गेला आणि... पुढे जे घडलं ते पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. हे भयानक दृश्य कॅमेर्‍यात कैद झालं. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे (Stunt Video viral). प्रसिद्धीसाठी, सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी हल्ली लोक कधी काय करतील याचा नेम नाही. किती तरी जण यासाठी आपला जीवही धोक्यात घालतात. जीवघेणे स्टंट करतात. अशाच लोकांपैकी हा एक तरुण. ज्याने आपला जीव दाव्याला लावला. हे वाचा - बापरे! दोरीवरून 2 डोंगर पार करण्याचा तरुणाने केला प्रयत्न शेवटी...; काळीज घट्ट करून पाहा हा VIDEO earthpix नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
व्हिडीओत तुम्ही पाहून शकता आकाशात उंचावर दोन पॅराशूटला एक दोरी बांधण्यात आली आहे. त्यावर एक व्यक्ती सुरुवातीला बसलेली दिसते. इतक्या उंचावर हवेचा वेगही जास्तच असणार. हे या व्हिडीओतही दिसतं आहे. दोरी हवेने हलते आहे. तरी ही व्यक्ती त्यावर आपला तोल सावरत चालते. हे वाचा -  Anaconda दिसताच उत्साहात फोटो काढायला त्याच्या जवळ गेला आणि...; अंगावर काटा आणणारा VIDEO पण एक क्षण असा येतो की या व्यक्तीचा तोल ढासळतो आणि धाडकन आकाशातून जमिनीवर कोसळते. सुदैवाने या व्यक्तीने हा खतरनाक स्टंट करताना पॅराशूट घातलेलं होतं त्यामुळे जशी ती खाली कोसळली तिचं पॅराशूट उघडलं. त्यामुळे ती सुरक्षित आहे.
First published:

Tags: Stunt video, Viral, Viral videos

पुढील बातम्या