148 प्रयत्नांनंतर अखेर जमलं! दोरीवरून चालत टेनिस खेळणाऱ्या तरुणाचा VIDEO VIRAL

148 प्रयत्नांनंतर अखेर जमलं! दोरीवरून चालत टेनिस खेळणाऱ्या तरुणाचा VIDEO VIRAL

अगदी कुशल पद्धतीने एखाद्या अॅथलिटला हे जमवण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागत असेल हे या व्हिडीओमधून आपल्याला पाहता येऊ शकतं.

  • Share this:

नवी दिल्ली, 14 नोव्हेंबर : खेळ खेताना आपल्याला आवश्यक असते ती एकाग्रता. संपूर्ण लक्षा त्या खेळाकडे असायला हवं. मात्र एक तरुण वेगवेगळ्या अडथळ्यांचा सामना करत वेगवेगळे खेळ एकाच वेळी खेळत असल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे. या तरुणाची खेळण्यासाठी कसरत सुरू आहे आणि त्याच वेळी खेळाकडेही दुर्लक्ष होणार नाही याची काळजी तो घेत आहे. या तरुणाचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.

हा तरुण स्केटबोर्डवर उडी मारतो त्यानंतर दोरीवरून चालत जाताना टेनिस खेळतो, टायरसह बॅकफ्लिप करतो लाडकी फळीवरून सायकल चालवतो असे वेगवेगळे खेळ मास्क घालून हा तरुण करतो. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी हा व्हिडीओ रिट्वीट केला आहे. ते हा व्हिडीओ पाहून खूप थक्क झाले.

हे वाचा-ताण वाढवणारे नव्हे ताण हलका करणारे! दिवाळीची मिठाई आणि फराळासाठी काही टीप्स

ऑलिंपिकच्या अधिकृत ट्वीटरवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. स्विस फ्रीस्टाइल स्कीयर स्नोबोल्डर अॅन्ड्री रॅगेटली असं या तरुणाचं नाव आहे. वेगवेगळे ऑप्स्टेकल्स पार करत हा तरुण खेळत असल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. 6.6 हजारहून अधिक या तरुणाच्या व्हिडीओला लाईक्स मिळाले आहेत. साधारण 148 वेळा प्रयत्न केल्यानंतर त्याला एकाच दमात एवढं सगळं यशस्वीपणे करायला जमलं असं सांगितलं जात आहे.

अगदी कुशल पद्धतीने एखाद्या अॅथलिटला हे जमवण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागत असेल हे या व्हिडीओमधून आपल्याला पाहता येऊ शकतं. सोशल मीडियावर या तरुणाचं तुफान कौतुक देखील केलं जात आहे. अनेक युझर्सनी याच्या धौर्याचं आणि जिद्दीचं तोंडभरून कौतुक केलं आहे. तर काहींनी त्याला शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

Published by: Kranti Kanetkar
First published: November 14, 2020, 9:59 AM IST

ताज्या बातम्या