Home /News /viral /

बापरे! अचानक फुग्यासारखी फुगली तरुणाची पाठ; सुई मारताच...; डॉक्टरने शेअर केला धक्कादायक VIDEO

बापरे! अचानक फुग्यासारखी फुगली तरुणाची पाठ; सुई मारताच...; डॉक्टरने शेअर केला धक्कादायक VIDEO

तरुणाच्या पाठीवरील फुग्यावर डॉक्टरांनी तब्बल 33 सुया टोचल्या.

    लंडन, 09 डिसेंबर : अनेकदा आपल्या शरीरावर एखाद्या ठिकाणी सूज येते. बहुतेक वेळा आपण त्याकडे सामान्य म्हणून दुर्लक्षच करतो. काही वेळा अगदी घरगुती उपाय करून ही सूज गायबही होते. पण प्रत्येक वेळी असं होईलच असं नाही. काही वेळा ही सूज गंभीर रूप धारण करू शकते. सध्या असंच एक प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. ज्यात एका तरुणाच्या पाठीचा एक भाग फुग्यासारखा फुगत गेला (Man back swell like balloon). डॉ. सँड्रा यांनी आपल्या टिकटॉक अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. डॉ. सँड्रा या एमडी आहेत, डॉ. पिम्पल पॉपर (Dr Pimple Popper)  म्हणून त्या प्रसिद्ध आहेत. रुग्णाच्या शरीरावरील असे विचित्र फोड फोडण्याचे त्यांचे बरेच व्हिडीओ आहेत. डॉ. सँड्रा यांनी त्यांच्याकडे नुकत्याच आलेल्या एका रुग्णाचा व्हिडीओ शेअर केला आहे. डेलनो असं या रुग्णाचं नाव. त्याच्या पाठीचा एक भाग फुग्यासारखा फुगला होता. हे वाचा - बापरे! स्ट्रीट फूडमध्ये महिलेला सापडलं असं काही की VIDEO पाहून थरकाप उडेल डॉ. सँड्रा यांनी तरुणाच्या या फुगलेल्या पाठीवर सुई टोचली. इंजेक्शनने त्यांनी त्याच्या त्या फुगलेल्या भागातून पू बाहेर पडला. त्यांनी तब्बल 33 इंजेक्शन भरून पू काढला. याचा व्हिडीओही त्यांनी बनवला. ज्या इंजेक्शननी हा पू काढला त्या इंजेक्शनचे फोटोही त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. 33 सुया टोचून पू काढल्यानंतर तरुणाच्या पाठीवर फुग्यासारखा फुगलेला भाग सपाट झाला.  पाठीच्या या फुगलेल्या भागात भरलेलं लिक्विड आपण बाहेर काढलं आहे. पण हे लिक्विड पाठीत कसं आणि कुठून आहे, त्यामागील कारण काय हे आपल्याला माहिती नाही. कदाचित हे लिक्विड पुन्हा तिथं जमा होऊ शकतं, असं डॉ. सँड्रा यांनी रुग्णाला स्पष्टपणे सांगितलं.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Lifestyle, Viral, Viral videos

    पुढील बातम्या