• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • पत्नीला सोडून विवाहित महिलेच्या प्रेमात पडला युवक; प्रेग्नन्सीमुळे कथेत आला मोठा ट्विस्ट

पत्नीला सोडून विवाहित महिलेच्या प्रेमात पडला युवक; प्रेग्नन्सीमुळे कथेत आला मोठा ट्विस्ट

आपण मुलांशिवाय जगण्याचा निर्णय घेतल्याचं मॅथ्यु सांगायचा पण, ऍश्लेच्यामते असा कोणताही निर्णय झाला नव्हता. मुलं झाली तर आपल्याला फिरता येणार नाही असं म्हणत मॅथ्यु ऍश्लेची समजूत काढण्याचा प्रयत्न करायचा. काही दिवसांनी मॅथ्यु तयार झाला आणि ऍश्लेला प्रचंड आनंद झाला.

आपण मुलांशिवाय जगण्याचा निर्णय घेतल्याचं मॅथ्यु सांगायचा पण, ऍश्लेच्यामते असा कोणताही निर्णय झाला नव्हता. मुलं झाली तर आपल्याला फिरता येणार नाही असं म्हणत मॅथ्यु ऍश्लेची समजूत काढण्याचा प्रयत्न करायचा. काही दिवसांनी मॅथ्यु तयार झाला आणि ऍश्लेला प्रचंड आनंद झाला.

या व्यक्तीनं लिहिलं, की लॉकडाऊनमध्ये (Lockdown) माझं एका विवाहित महिलेसोबत अफेअर सुरू झालं, जिचं नाव जे असं होतं. जे हिनं मला म्हटलं की मी तिचं खरं प्रेम (True Love) आहे

 • Share this:
  नवी दिल्ली 26 जुलै : नात्यामध्ये (Relations) चढउतार येणं ही सामान्य बाब आहे. मात्र, परिस्थिती हाताबाहेर गेल्यास अनेकजण एक्सपर्टचा (Expert) सल्ला घेतात. नाव न सांगण्याच्या अटीवर एका पुरुषानं रिलेशनशिप एक्सपर्टकडे मदत मागितली आहे. या व्यक्तीनं द गार्जियनच्या कॉलममध्ये आपल्या लव्ह लाईफबाबतच्या (Love Life) समस्या मांडल्या आहेत. या व्यक्तीनं लिहिलं, की लॉकडाऊनमध्ये (Lockdown) माझं एका विवाहित महिलेसोबत अफेअर सुरू झालं, जिचं नाव जे असं होतं. जे हिनं मला म्हटलं की मी तिचं खरं प्रेम (True Love) आहे, कारण माझ्यासोबत असताना तिला जे अनुभवता येतं ते याआधी तिनं कधीच अनुभवलं नाही. मीदेखील तिच्याबाबत असाच अनुभव घेत होतो. जे आधीपासूनच विवाहित होती, मात्र पतीसोबत झालेल्या भांडणांमुळे तिनं आपल्या पतीला सोडलं होतं. मीदेखील विवाहित (Married) होतो. मात्र, पत्नीसोबत फार न जुळल्यानं मीदेखील तिच्यापासून वेगळं झालो होतो. आता आम्ही दोघं सोबत एका नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी तयार होतो. 8 वर्षांआधी मृत्यू झालेल्या गर्लफ्रेंडसोबत आजही बोलतो हा व्यक्ती; कसं झालं शक्य? मात्र, काही दिवसातच मला हे समजलं की जे प्रेग्नंट (Pregnant) आहे आणि याचा परिणाम आमच्या नात्यावरही झाला. आम्हाला दोघांनाही मुल हवं होतं पण ते इतक्या लवकर होईल, असा विचार आम्ही केला नव्हता. मी ही परिस्थिती सांभाळू शकत नव्हतो आणि हळूहळू आम्ही एकमेकांपासून दूर जाऊ लागलो. मात्र, मला हे नातं संपवायचं नव्हतं. काही दिवसातच जे हिनं मला एक स्कॅन रिपोर्ट पाठवला आणि सांगितलं, की तिच्या होणाऱ्या बाळाचा बाप तो नसून तिचा आधीचा पती आहे. यासोबतच जेनं असंही म्हटलं की आता तिला माझ्यासोबतच नातं संपवायचं आहे. मी बऱ्याच पद्धतीनं रिपोर्ट तपासण्याचा प्रयत्न केला कारण मला असंच वाटत होतं की ते बाळ माझंच आहे. मात्र, जेनं याला पूर्णपणे नकार दिला आणि वारंवार तिनं हेच सांगितलं की तिचा नवराच या मुलाचा बाप आहे. जे हिनं म्हटलं की आता तिला आरामात आणि शांततेत आयुष्य जगायचं आहे. ती आपल्या पतीसोबतचं नातं सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. तिच्या पतीला माझ्याबाबत काहीही माहिती नाही. तिनं माझ्यासोबतचा संपर्क तोडला आहे. मी आतून तुटलो आहे आणि मला हे नातं संपवायचं नाही. मात्र मला तिला नाराजही करायचं नाही. मी त्या बाळासाठी दर महिन्याला पैसे वाचवून ठेवतोय, जेणेकरून भविष्यात गरज पडल्यास मी तिची मदत करू शकेल. हे बरोबर आहे की चुकीचं माहिती नाही. प्लीज माझी मदत करा. Dil toh baccha hain! लग्नातच नवरीची मस्ती; VIDEO जिंकतोय नेटकऱ्यांची मनं रिलेशनशिप एक्सपर्टनं म्हटलं, की जर जे हिनं आपल्या पतीला घटस्फोट दिला नसेल तर या बाळावर तुमचा कायदेशीर काहीही हक्क नाही. मात्र, सत्य जाणून घेण्यासाठी तुम्ही बाळाच्या जन्मानंतर त्याची डीएनए टेस्ट करू शकता. मात्र, यासाठी जे हिची परवानगी घ्यावी लागेल. हे बाळ तुमचंच आहे याची तुम्हाला पूर्ण खात्री असेल तर तुम्ही याबाबत कोर्टात मदत मागू शकता. हे प्रयत्न तुम्ही तेव्हाच करा, जेव्हा तुम्ही आयुष्यभरासाठी या बाळाची साथ देण्यास तयार असाल.
  Published by:Kiran Pharate
  First published: