Home /News /viral /

VIDEO : याला म्हणतात डोकं ! उरावर बसलेल्या वाघाला त्याने असं पळवलं

VIDEO : याला म्हणतात डोकं ! उरावर बसलेल्या वाघाला त्याने असं पळवलं

वाघाच्या तावडीत एखादा व्यक्ती सापडला म्हणजे तो वाघाचा शिकार झालाच त्याची सुटका नाहीच. मात्र एका व्यक्तीने चक्क वाघापासून आपला जीव वाचवला आहे.

    मुंबई, 2 फेब्रुवारी :  वाघ समोर दिसताच प्रत्येकाच्या तोंडचं पाणी पळतं, अंगाला घाम फुटतो. वाघाच्या तावडीत एखादा सापडला म्हणजे तो संपलाच. मग अशावेळी जीव वाचवण्याच्या प्रयत्न करण्याचा काहीच फायदा नाही. मात्र वाघ उरावर बसलेला असतानाही एक व्यक्तीने युक्ती लढवून आपला जीव वाचवला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आयपीएस अधिकारी परवीन कसवान यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला बालवयात ऐकलेल्या एका गोष्टीची आठवण जरूर झाली असेल. हो बरोबर तीच गोष्ट.  2 मित्र एका जंगलात असताना तिथं अस्वल येतो. त्यावेळी जीव वाचवण्यासाठी एक मित्र पटकन झाडावर चढतो, मात्र दुसऱ्या मित्राला झाडावर चढता येत नसल्याने तो झाडाच्या खालीच राहतो. अस्वल आपल्या जवळ येत असल्याचं पाहताच तो जमिनीवर पडून श्वास रोखून धरतो आणि मरण्याचं नाटक करतो. अस्वल हा व्यक्ती मृत असल्याचं समजून तिथून निघून जातो. आपण सर्वांनी आपल्या बालवयात ऐकलेली ही गोष्ट आणि हीच गोष्ट या व्यक्तीला खऱ्या आयुष्यात उपयोगी पडली. हीच युक्ती वापरून त्याने आपला जीव वाचवला आहे. या घटनेचा पूर्ण व्हिडिओही ट्विटवर शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये ही घटना महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातल्या तुमसरमधील असल्याचंही सांगण्यात आलं आहे. जमावाला घाबरून हा वाघ संपूर्ण शेतात पळतो. त्याच्या तावडीत हा व्यक्ती सापडतो, वाघ त्याच्या उरावर बसतो, मात्र अशावेळी हा व्यक्ती त्या वाघाशी शक्तीने नाही तर युक्तीने लढतो. त्याचवेळी आसपासचा जमाव वाघाला पळवण्याचा प्रयत्न करतो. व्यक्ती मृत असल्याचं पाहून आणि जमावाच्या भीतीने वाघ तिथून धूम ठोकतो. त्यानंतर मरण्याचं नाटक करणारा व्यक्तीही सुटकेचा श्वास सोडतो.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Tiger attack, Tiger video

    पुढील बातम्या