मुंबई 01 डिसेंबर : मोठ्या शहरांमध्ये भाडेतत्त्वावर घर घेणं खूप जिकिरीचं झालं आहे. घर भाड्याने घेताना भाडेकरारासह अनेक प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. त्यातच घरमालकाचे अनेक नियम आणि अटी समजून घ्याव्या लागतात. या दोन्ही गोष्टींमुळे भाडेकरू त्रस्त होतात; पण गरज असल्याने भाडेकरू या सर्व गोष्टी पूर्ण करतात. सध्या बेंगळुरूमधला एका ब्रोकर आणि घराच्या शोधात असलेल्या महिलेचा संवाद सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. घर भाडेतत्त्वावर घेण्यासाठी घरमालकाने सांगितलेल्या अटींवर आधारित हा संवाद आहे. रेंटवर घेतलेल्या घरात तुम्हाला पार्टी करता येणार नाही, तसंच पुरुष मित्रांना या घरात प्रवेश देण्यास परवानगी नसेल, असं ब्रोकरने या महिलेला संवादादरम्यान सांगितलं आहे. व्हॉट्सअॅपवरच्या या संवादाचा स्क्रीनशॉट खुद्द त्याच महिलेने ट्विटरवर शेअर केला आहे. या पोस्टवर नेटिझन्सनी कमेंट्स करून स्वानुभव शेअर केले आहेत. तसंच अनेक युझर्सनी प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत. हा संवाद आणि घरमालकाच्या अटी नेमक्या काय आहेत, ते जाणून घेऊ या. `आज तक`ने याविषयी माहिती देणारं वृत्त दिलं आहे.
बेंगळुरूतली एक महिला रेंटवरच्या घराच्या शोधात आहे. यादरम्यान तिच्या ब्रोकरसोबत झालेला संवादाचा स्क्रीनशॉट व्हायरल झाला आहे. या महिलेने व्हॉट्सअॅपवर झालेल्या संवादाचा स्क्रीनशॉट ट्विटरवर शेअर केला आहे. रेंटवरच्या घरात तुम्हाला पार्टी करता येणार नाही. तसंच पुरुष मित्रांना या घरात येण्यास परवानगी नसेल, असं ब्रोकरने या महिलेला सांगितलं. त्यावर असं नियंत्रण ठेवणाऱ्या घरमालकाचं घर नको, असं त्या महिलेने ब्रोकरला सांगितलं. या महिलेने ट्विटरवर या संवादाचा स्क्रीनशॉट शेअर करताच या पोस्टवर ट्विटर युझर्सच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. काही ट्विटर युझर्सनी आपले अनुभवही शेअर केले आहे.
हेही वाचा - Optical Illusion : गार्डनमधील 'या' साध्या फोटोत लपलाय कुत्रा, तुम्ही त्याला शोधून दाखवणार का?
संवादादरम्यान या महिलेनं सांगितलं की, `प्रत्येक ब्रोकर मला विवाहित आहे का असा प्रश्न विचारत आहे. कारण विवाहित व्यक्ती कंटाळवाणं जीवन जगतात. त्यामुळे त्यांनी घर घेतलं पाहिजे. मी आता उद्यापासून विवाहित म्हणून बेंगळुरूत घर शोधणार आहे. माझा पती भूत असेल. घरात पार्टी होणार नाही आणि कोणीही पुरुष मित्र घरात येणार नाही, याची काळजी तो घेईल.`
`दोन महिला घरात राहू शकतात का?` असा प्रश्न त्या महिलेने ब्रोकरला विचारला. त्यावर `घरमालकाला विचारून कळवतो,` असं उत्तर ब्रोकरने दिलं. त्यानंतर ब्रोकरनं त्या महिलेला विचारलं, `तुम्ही पार्टी करता का? माझ्याकडे 2 बीएचके नवा फ्लॅट आहे; पण तिथं पार्टी करण्यास आणि घरात पुरुष मित्रांना प्रवेश देण्यास परवानगी नाही.` त्यावर, `सर आमच्या अनेक गोष्टींवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या घरमालकाचं घर नको,` असं उत्तर त्या महिलेनं दिलं.
या संवादाचा स्क्रीनशॉट ट्विटरवर पोस्ट होताच, त्यावर अनेक युझर्सनी प्रतिक्रिया दिल्या. त्यात एक युझर या महिलेला सल्ला देताना लिहितो, की `तुम्ही तुमचा पती लष्करात आहे, असं त्या ब्रोकरला सांगायला हवं होतं म्हणजे तुम्हाला सहज घर मिळालं असतं.`
@shaiz_princess नावाचा एक युझर कमेंट करताना लिहितो, `माझ्या घरमालकाने तर मला एक विचित्र अट घातली होती, की जेव्हा कोणी पाहुणे येतील तेव्हा त्याला त्यांच्याबद्दल माहिती कळवावी लागेल. यावर मी घरमालकाला म्हटलं होतं की मला घर हवंय तुरुंग नाही.`
`एका घरमालकाने तर मला माझ्या जातीविषयी विचारलं,` असं @malagali_somu या ट्विटर युझरने कमेंट करताना लिहिलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral news, Viral photo