मुंबई, 25 मे : शहरातील काही लोक आपल्या घरातील काम करण्यासाठी, तसेच आपल्याला मदत म्हणून नोकर ठेवतात. ज्यामुळे त्यांचं काम हलकं होतं. या कामाचे ते नोकरांना पैसे देखील देतात. पण असं असलं तरी देखील नोकरांना घरी बोलावणे हे थोडं जोखमीचं काम आहे. कारण सगळेच लोक इमानदार किंवा विश्वासू असतीलच असे नाही. नोकरांनी चोरी केल्याच्या किंवा गुन्हा केल्याच्या अनेक घटना देखील तुम्ही ऐकल्या असतील. पण सध्या समोर आलेला प्रकार हा धक्कादायक आहे.
हा प्रकार ग्रेटर नोएडाच्या अजनारा सोसायटीमधील आहे. येथे एका मोलकरणीनं असं कृत्य केलं की ज्याबद्दल जाणून तुम्हाला धक्का बसेल. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मोलकरणीचं कृत्य खरंच खूप किळसवाणं आहे.
चोरांचा नादच खुळा! चालवता येत नाही, पण तरीही चोरली मारुती व्हॅन आणि मग...
ग्रेटर नोएडा येथील अजनारा होम्स सोसायटीच्या फ्लॅटमध्ये काम करणारी एक मोलकरीण मॉपिंग करत होती, पण तिने ज्या पाण्याने मोप केले त्याबद्दल जाणून धक्का बसेल. खरंतर या मोलकरणीने लादी पुसण्याच्या पाण्यात लघवी केली आणि त्याच पाण्याने घर देखील साफ केले. हे बघून तुम्हालाही किळस येईल.
घरमालकाला याची माहिती मिळताच घरमालकाने मोलकरणीची पोलिसांत तक्रार केली. या प्रकरणाचा तपास केल्यानंतर पोलिसांनी या तक्रारीवरून मोलकरणीला याबद्दल जाब विचारले असता मोलकरणीने आपली चूक मान्य केली आहे.
तरुणाने आपल्या बायकोला प्रियकरासोबत पाहिलं खोलीत आणि मग... संपूर्ण प्रकरण कॅमेऱ्यात कैद
घरामध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मोलकरणीचे हे घाणेरडे कृत्य कैद झाले आहे.
तपासानंतर पोलिसांनी आरोपी मोलकरणीला अटक केली. नुकतेच एका मोलकरणीने केलेल्या चोरीशी संबंधित एक प्रकरण समोर आले होते, ज्यात मोलकरणीने घरमालकाच्या घरातून 50 लाख रुपयांचे दागिने चोरले होते. मालकिणीचे दागिने घालून मोलकरीण पार्टीला गेली तेव्हा ही बाब उघडकीस आली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shocking, Social media, Social media trends, Top trending, Viral