मुंबई, 6 मार्च : प्रसिद्ध उद्योजक आणि महिंद्रा अँड महिंद्राचे (Mahindra & Mahindra) चेअरमन आनंद महिंद्रा (Anand Mahindra) सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. विविध व्हिडीओज शेअर करणं, आवडलेल्या गोष्टींचं कौतुक करणं हे ते सतत करत असतात. (auto news)
ट्विटरवरचा त्यांचा वावर अनेकांचं लक्ष वेधून घेतो. आनंद महिंद्रा यांनी नुकतंच काही लोकांचं मनापासून जाहीर आभार मानलं. नेमकं काय घडलं होतं? (Anand Mahindra on twitter)
झालं असं, की नुकतंच आनंद महिंद्रा यांनी AutoWheelsIndia च्या एका ट्वीटला रिट्विट करत म्हणलं, जेव्हा कुण्या व्यक्तीला कार खरेदी करायची असते, तेव्हा तो आपल्या आवडीचीच कार विकत घेतो. मात्र जेव्हा 6 दोस्त एकाच वेळी एकाच कारचं मॉडेल खरेदी करतात, तेव्हा ती एक चळवळ बनते.' या सहाही लोकांना आनंद महिंद्रा यांनी मनापासून धन्यवाद दिले आहेत. (Anand Mahindra thanks 6 friends on twitter)
(हे वाचा कोरोना महासाथीचा चिमुरड्यांवर होतोय गंभीर परिणाम? UNICEF चा धक्कादायक अहवाल)
महिंद्रानं जानेवारी 2021 मध्ये XUV300 चं नवीन ऑटोमॅटिक वॅरियन्ट मार्केटमध्ये आणलं. ही XUV300 दिसायला अत्यंत आकर्षक आहे. याचं इंजिन अत्यंत ताकदवान आहे. W6 Trim हे याचं आकर्षक वैशिष्ट्य. या मॉडेलची किंमत 9.95 लाख रुपये आहे. (एक्स शोरूम, दिल्ली) (6 friends buy Mahindra SUV)
When one person buys a car, it’s a personal passion. When six friends buy the same car model at the same time, it’s a movement! 😊 A big vote of thanks to all of you! https://t.co/xznBEpNL72
— anand mahindra (@anandmahindra) March 5, 2021
नव्या XUV 300 चे फीचर्स
ही एसयूव्ही नव्या ऑटोमॅटिक ट्रान्समिशन गियरबॉक्स W8आणि W8 (O)वॅरियन्टमध्ये उपलब्ध आहे. महिंद्रानं या एसयूव्हीमध्ये स्पेशल ब्लू सेन्स प्लस कनेक्टेड टेक्नॉलॉजी वापरली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या एसयूव्हीची बुकिंगही सुरू केली गेली आहे.
कंपनी या मॉडेलची डिलिव्हरीसुद्धा लवकरच सुरू करणार आहे. ही नवी एसयूव्ही दोन रंगाच्या वॅरियन्टमध्ये बाजारात उपलब्ध आहे. ड्युअल टोन रेड आणि ड्युअल टोन अक्वामरीन हे ते दोन रंग आहेत. Mahindra SUV 300 latest news
(हे वाचा गात गातच घेतली कोरोना लस; गायिकेच्या लसीकरणाचा VIDEO VIRAL)
याचं इंजिन 1.2 लिटरचं टर्बो चार्ज पेट्रोल इंजिन आहे. जे 109 BHPची पावर आणि 200 NM टॉर्क जनरेट करतं. याशिवाय हे एसयूव्ही डिझेल इंजिनसह उपलब्ध आहे. या इंजिनाची क्षमता 1.5 लिटर आहे. हे इंजिन 115 BHPची पावर आणि 300 NM टॉर्क जनरेट करतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Anand mahindra, Friendship, Social media, Twitter