मराठी बातम्या /बातम्या /Viral /मुजरा! राज्यभर व्हायरल होतोय TikTok VIDEO; तुम्ही पाहिलंच असेल हे Whatsapp status

मुजरा! राज्यभर व्हायरल होतोय TikTok VIDEO; तुम्ही पाहिलंच असेल हे Whatsapp status

संपुर्ण राज्यभरात ' Whatsapp status ' वर नऊवारी साडीतील तरुणीचा ' TikTok ' व्हिडिओ शेअर केला जात आहे.

संपुर्ण राज्यभरात ' Whatsapp status ' वर नऊवारी साडीतील तरुणीचा ' TikTok ' व्हिडिओ शेअर केला जात आहे.

संपुर्ण राज्यभरात ' Whatsapp status ' वर नऊवारी साडीतील तरुणीचा ' TikTok ' व्हिडिओ शेअर केला जात आहे.

मुंबई, 18 फेब्रुवारी : ' TikTok ' या अॅपने देशभरात सर्वांनाच वेड लावलाय. तरुणांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वच ' TikTok ' वर व्हिडिओ बनवत असतात किंवा बघत असतात. सध्या महाराष्ट्रात नऊवारी साडीतील एका तरुणीचा ' TikTok ' व्हिडिओ  ' Whatsapp status ' वर तुफान शेअर होत आहे. आणि हा व्हिडिओ व्हायरल होण्यामागचं महत्वाचं कारण म्हणजे 19 फेब्रुवारीला साजरी केली जाणारी शिवजयंती. या व्हिडिओमुळे शिवजयंती आधीच संपूर्ण वातावरण भगवंमय झाल्याचं दिसत आहे.

महाराष्ट्राचं आराध्य दैवत मानल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 19 फेब्रुवारीला साजरी केली जाणार आहे. त्यामुळे शिवजयंतीनिमित्त हा  व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. यामध्ये एक तरुणी नऊवारी साडी नेसून, पारंपारिक अलंकार परिधान करून रस्त्यावरून चालत जाताना दाखवली आहे. येणारा प्रत्येकजण त्या मुलीसमोर मुजरा, हात जोडत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. सुरुवातीची काही सेकंद येणारा प्रत्येकजण जिजाऊंच्या लेकीसमोर मुजरा करत असल्याचं दिसतं. मात्र दुसऱ्याच क्षणाला कॅमेरा पुढे येतो आणि सर्वजण त्या तरुणीसमोर मुजरा का करतात याचा उलगडा होतो. त्या तरुणीच्या हातात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती असते. आणि येणारा जाणारा प्रत्येकजण त्या मूर्तीला बघून मुजरा करत असल्याचं कळतं.

हा व्हिडिओ शिवप्रेमी सर्वाधिक शेअर करत आहेत. शिवजयंतीच्या निमित्ताने हा TiKTok व्हिडिओ Whatsapp status वर सर्वाधिक शेअर केला जात आहे. या ' TikTok ' व्हिडिओवर शिवप्रेमींकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.

शिवजंयतीनिमित्त शिवप्रेमी अनेक फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. मात्र यावेळेला महाराष्ट्रभर नऊवारी साडीतील या तरुणीचा ' TikTok ' व्हिडिओ प्रत्येकाच्याच ' Whatsapp status ' वर झळकताना दिसत आहे.

कीर्तनकार इंदुरीकर महाराजांचा अडचणीत आणखी भर!

साहेबाच्या देशावर आता भारतीयांचं राज्य; ब्रिटीश मंत्रिमंडळातला 'देशी' वट वाढला

First published:

Tags: Shivjayanti, Tiktok, Tiktok viral video, Viral