मुंबई, 04 जानेवारी: रानु मंडलच्या गाण्याचा 'इमानदार' चाहत्याच्या गाण्यानं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. तसाच एक व्हिडिओ पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. या व्हिडिमधली खास गोष्ट ही आहे की इथे चक्क मंदिरात भजनाला साथ दिली आहे. देवळात सुरू असणाऱ्या भजनाला श्वानानं साथ दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. मंदिरात रात्रीच्यावेळी ग्रामस्थांचं भजन सुरू होतं. त्याच वेळी तिथे असलेल्या पांढऱ्या रंगाच्या श्वानानं ग्रामस्थांच्या सुरात सूर मिसळण्याचा प्रयत्न केला. त्यानेही भजनाला उत्तम साथ देण्याचा प्रयत्न केला आहे.
तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता मंदिरात सुरू असलेल्या भजनात पांढऱ्या रंगाचा कुत्रा कसा साथ देत आहे ते. सुरुवातील ग्रामस्थांनाही या गोष्टीचं फार अप्रूप वाटलं. पेटी वाजवत असणाऱ्या कांकांच्या बाजूला उभं राहुन हा कुत्रा आपला सूर त्यांच्यासोबत मिळवू पाहात आहे. असं या व्हिडिओतून आपल्याला दिसतंय.
एका देवळात भजन सुरू असताना भजन गायला श्वानही साथ देत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हि़डिओ कुठला आहे हे कळू शकलेले नाही मात्र हा महाराष्ट्रातीलचं कोणत्यातरी मंदिरातील असण्याची शक्यता आहे असा अंदाज नेटकऱ्यांनी वर्तवला आहे.
असाच एका व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये श्वानाने रानू मंडल यांचं गाणं गायलं होतं.
रानू मंडलने गायलेलं गाणं हार्मोनियमवर वाजवणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ फक्त हार्मोनियमवर त्याने रानू मंडलचं गाणं गायलं म्हणून व्हायरल होतो आहे असं नाही. तर त्यामागचं कारण वेगळंच आहे.
व्हिडिओमध्ये दिसतं की, व्यक्ती रानू मंडलचे तेरी मेरी कहानी हे गाणं हार्मोनियमवर वाजवत आहे. याचवेळी त्याच्या शेजारी इमानदार प्राणी म्हणून ओळख असलेला कुत्रा त्याची नक्कल करत आहे. या व्हिडिओला अर्ली मोर्निग रियाज असे कॅप्शन देऊन सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.
कुत्रा हार्मोनियमच्या सुरात सूर मिसळण्याचा प्रयत्न करताना दिसतो. संगीतप्रेमी श्वानाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.