बोर्डाचा रिझल्ट हॉटेलमध्ये! सर्वात Viral मेन्यूकार्ड

बोर्डाचा रिझल्ट हॉटेलमध्ये! सर्वात Viral मेन्यूकार्ड

हॉटेलमध्ये मेनूकार्डऐवजी बोर्डाचा निकाल हाती आला तर काय होईल? नेमका काय घडला प्रकार वाचा सविस्तर

  • Share this:

मुंबई, 18 डिसेंबर : हॉटेलमध्ये गेल्यावर आपण सर्वात आधी काय विचारतो काय तयार आहे किंवा काय मिळेल किंवा हातात येत मेनूकार्ड पण या मेनूकार्डऐवजी बोर्डाचा निकाल हाती आला तर एक क्षण आपल्याला धक्काच बसेल काहीच सुचणार देखील नाही. असाच एका गमतीशीर प्रकार समोर आला आहे. या मेनूकार्डची चर्चा महाराष्ट्रातील साताऱ्यातच नाही तर जगभरात होत आहे.

या हॉटेलचं मेनूकार्ड सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आता प्रश्न पडेल असं काय आहे या मेनूकार्डमध्ये तर दहावी-बारावीच्या बोर्डाच्या निकालासारखं चक्क हे मेनूकार्ड तयार करण्यात आलं आहे. हे मेनूकार्ड आहे की बोर्डाचा निकाल असा दोन मिनिटं आपल्याला प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. अगदी त्याचं पॅटर्नचं आणि तशा फॉरमॅटमध्ये हे मेनूकार्ड बसवण्यात आलं आहे. या मेनूकार्डची मात्र सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे.

या मेनूकार्डमध्ये पाहिलं तर जिथे बोर्डाचं नाव लिहिलेलं असतं तिथे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक खाद्य मंडळ पुणे असं लिहिण्यात आलं आहे. घरगुती व लज्जतदार जेवणाचं प्रमाणपत्र परीक्ष-दरपत्रक असं या पत्रकावर लिहिण्यात आलं आहे. आता प्रश्न पडेल की आपण मेनूकार्ड वाचतोय की बोर्डाचं प्रमाणपत्र. एका सेकंदासाठी हा संभ्रम नक्की झाल्याशिवाय राहणार नाही.

हे वाचा-हा सीन पाहून आठवेल Newton's Third Law, चमत्कार की विज्ञान VIDEO पाहून ठरवा

त्यानंतर अगदी बोर्डाच्या प्रमाणपत्रकाप्रमाणे शाखा क्रमांक, टेबल नंबर, केंद्र क्रमांक, जिल्हा आणि शाखा क्रमांक, परीक्षेचं वर्ष आणि सीट नंबर देखील देण्यात आला आहे. जिथे विषयाची नावं आणि गुण असतात तिथे पदार्थांची नावं आणि त्यांची किंमत अनुक्रमानं लिहिण्यात आलं आहेत. शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारचे मेनू यामध्ये लिहिण्यात आले आहेत. अगदी बोर्डाच्या प्रमाणपत्राची प्रतिकृती म्हणजे हे मनूकार्ड तयार करण्यात आलं आहे.

हे वाचा-मेंढ्या-बकऱ्यांचा शहरात धुमाकूळ, नागरिकांना केलेल्या मारहाणीचा VIDEO VIRAL

लॉकडाऊनंतर पुन्हा हॉटेल्स सुरू करण्यात आली आहेत. चवीसोबतच जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या योजना किंवा सुविधा दिल्या जात असताना अशा प्रकारचं आगळं वेगळं मेनूकार्ड महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरला आहे.

आपल्याकडे वस्तू विकण्यासाठी खूप भन्नाट आयडीया वापरल्या जातात कधी कुणाला कसा जुगाड सुचेल याचा काही नेम नाही. लॉकडाऊनंतर सुरू झालेल्या हॉटेलमध्ये ग्राहकांनी यावं यासाठी वेगवेगळ्या युक्त्या आणि आयडीया वापरल्या जातात. अशाच प्रकारे ही भन्नाट युक्ती हॉटेलच्या मालकानं वापली आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: December 18, 2020, 2:22 PM IST

ताज्या बातम्या