मराठी बातम्या /बातम्या /Viral /आश्चर्य! असा पाऊसही पडतो? चमत्कारिक VIDEO पाहून सर्वजण झाले हैराण

आश्चर्य! असा पाऊसही पडतो? चमत्कारिक VIDEO पाहून सर्वजण झाले हैराण

कधीच पाहिला नसेल असा पाऊस.

कधीच पाहिला नसेल असा पाऊस.

पावसाचा चमत्कारिक असा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

मुंबई, 18 जानेवारी : रिमझिम, धो-धो, मुसळधार असा पाऊस पडताना तुम्ही पाहिलं आहे. पण सध्या पावसाचा असा व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत. पावसाचा हा व्हिडीओ चमत्कारिकच म्हणावा लागेल. कारण हा व्हिडीओ पाहिल्यानंतर असाही पाऊस पडतो का? असा प्रश्न तुम्हाला पडेल. पावसाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एका रस्त्यावर पाणी पडताना दिसतं आहे. आता तुम्ही म्हणाल हे पाण्याच्या पाईपमधून पडणारं वगैरे पाणी आहे. तर तसं बिलकुल नाही. हे पाईपचं पाणी नव्हे तर चक्क पाऊस आहे. तुम्हालाही आश्चर्य वाटलं ना? आजूबाजूचा रस्ता पूर्ण सुका आहे, तिथं बिलकुल पाऊस पडत नाही आहे आणि इतक्याच जागेवर पाऊस कसा काय पडेल? असं तुम्हीही म्हणाल. पण जेव्हा कॅमेरा वरच्या दिशेने फिरवला जातो तेव्हा खरोखरच हे पाणी आकाशातून पडत असल्याचं दिसतं.

हे वाचा - हे काय आहे? विचारत IFS अधिकाऱ्याने शेअर केला भयानक फोटो; याचं सत्य समजताच हादराल

गावी पाऊस पडत असला तर शहरात नाही किंवा एखाद्या शहरात पाऊस पडतो एखाद्या शहरात नाही, शहरातही एखाद्या भागात पाऊस पडतो एखाद्या नाही. पण एखाद्या भागात फक्त असा एखाद्या ठिकाणीच पाऊस पडल्याचं तुम्ही पाहिलं नसेल.  जणू काही ढगांना छिद्र पडलं आहे किंवा ढगातून कुणीतरी नळ सुरू केला आहे, असंच वाटतं आहे. आता याला चमत्कार म्हणावं नाहीतर काय म्हणावं? असा चमत्कारिक पाऊस कदाचित तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीच पाहिला नसेल. या व्हिडीओतही तुम्ही पाहू शकता आजूबाजूने जाणारे लोकही आश्चर्यचकीत होत ढगाकडे पाहत राहिले आहेत.

हा व्हिडीओ नेमका कुठला आणि कधीचा आहे माहिती नाही. @TheFigen_ ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ढगांमध्ये बिघाड झाला आहे, असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यातआलं आहे.

हे वाचा - आश्चर्य! पाण्याबाहेर येताच माशाला फुटले पंख; विश्वास बसत नाही तर पाहा हा VIDEO

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. काही लोकांना द ट्रूमेन शो फिल्मची आठवण आली. ज्यामध्ये असाच एक सीन दाखवण्यात आला होता. पण ती फिल्म, हे तर प्रत्यक्षात घडतं आहे.

तुम्हाला का व्हिडीओ पाहून काय वाटतं? किंवा तुम्ही कधी असा निसर्गाचा अद्भुत चमत्कार पाहिला आहे का? किंवा हे असं का होतं? याबाबत तुम्हाला काही अधिक माहिती असेल तर ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

First published:

Tags: Rain, Viral, Viral videos