Home /News /viral /

लग्न सोहळ्यात चक्क Maggi! नेटकरी म्हणतायंत- प्रत्येक लग्नात असायला हवं हे काउंटर

लग्न सोहळ्यात चक्क Maggi! नेटकरी म्हणतायंत- प्रत्येक लग्नात असायला हवं हे काउंटर

मॅगी (Maggi) या 'इन्स्टंट नूडल्स' प्रकाराला आपण भारतीयांनी पूर्णपणे 'स्वदेशी' केलं आहे. मग भारतीय लग्नांमध्ये देखील मॅगी देण्यात आली तर आश्चर्य वाटायला नको

    मुंबई, 22 जानेवारी: आपल्या देशात लग्नसोहळ्यात पारंपरिक भोजनाला महत्त्व असतं. बदलत्या काळानुरूप पंगतीऐवजी बुफे पध्दत रूढ झाली आहे, तरीही जेवणाच्या बाबतीत पारंपरिक पदार्थांनाच पसंती दिली जाते. पण सध्या ट्विटरवर एका लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे, कारण त्या लग्नात चक्क मॅगीचा स्वतंत्र काउंटरच  ठेवण्यात आला होता. यावरून भारतीयांना मॅगीचं किती वेड आहे हे अगदी स्पष्ट झालं आहे. सौम्या लाखानी या युजरनं ट्विटर हँडलवर याबाबतचे एक ट्वीट शेअर केले आहे. तिनं तिच्या बहिणीचे कौतुक केले आहे, कारण तिनं तिच्या लग्नात पाहुण्यांना इन्स्टंट नूडल्स घालण्यासाठी खास मॅगीचा काउंटर ठेवला होता. या युजरने त्या काउंटरचा फोटोही शेअर केला आहे. ट्विटरवर ही पोस्ट व्हायरल झाली असून कौतुक करणाऱ्या कमेंटसचा पाऊस पाडला आहे. एका युजरनं लग्नात हा सर्वात लोकप्रिय काउंटर ठरला असणार, असं ठामपणे म्हटलं आहे, तर दुसर्‍या एका इन्स्टंट नूडल फॅननं प्रत्येक लग्नाला मॅगी काउंटर असावा, अशी इच्छा व्यक्त केली आहे. एका युजरनं लग्नाच्या पदार्थांमध्ये मॅगीचा समावेश केला जावा, अशी इच्छा व्यक्त केली आहे. एका युजरनं ही कल्पना गेमचेंजर ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. जगभरात पसरलेल्या कोव्हिड साथीमुळं लग्नसमारंभावर निर्बंध असल्यानं अजून पूर्वीप्रमाणे लग्नसोहळे होत नाहीत. भारतीय विवाहसोहळ्यांमध्ये देखील बदल करावे लागले आहेत.  सुरक्षित अंतर राखणं आवश्यक असल्यानं लग्न सोहळ्यासाठी आमंत्रित पाहुण्यांची संख्या मर्यादित ठेवावी लागत असून, काही विधीही कमी करावे लागत आहेत. पूर्वीसारखे शेकडो, हजारो लोकांच्या उपस्थितीत होणारे भव्य विवाहसोहळे सध्या होत नाहीत. (हे वाचा-डरकाळी देताच वाघाच्या तोंडातून आला धूर; कधीच पाहिला नसेल असा VIDEO) अनेक पारंपारिक विधी, वैविध्यपूर्ण खाद्यपदार्थांची रेलचेल असलेले भोजनसमारंभ आणि पाहुण्यांची गर्दी ही भारतीय विवाह सोहळ्यांची खासीयत आहे. सध्या मात्र या सगळ्यावरच निर्बंध आल्यानं एक नवीन संकल्पना उदयास आली आहे, ती म्हणजे ऑनलाइन माध्यमातून पाहुणे लग्नाला हजेरी लावत असून, त्यांना लग्नाचं खास भोजन त्यांच्या घरी पाठवून देण्यात येत आहे. यामुळं लग्नाच्या प्रत्यक्ष ठिकाणी गर्दी न करता, लग्नसोहळा अनुभवता येतोच; पण भोजनाचा आनंदही घरबसल्या घेता येतो.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या