Home /News /viral /

VIDEO : हा काय प्रकार आहे! चालताही येत नाही अशा मार्केटमधून रोज धावते ट्रेन

VIDEO : हा काय प्रकार आहे! चालताही येत नाही अशा मार्केटमधून रोज धावते ट्रेन

दुकानं सुरू असतानाच रोज येते ट्रेन आणि...

    मॅक्लॉन्ग, 14 जानेवारी : आजच्या या डिजिटल टप्प्यात नेहमीच काही ना काही व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी लोकांना हसवणारे, रडवणारे तर कधी कधी डोळ्यांत पाणी आणणारे व्हिडीओही असतात. पण सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. बँकॉकचा एक धक्कादायक व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. हा व्हिडिओ बँकॉकच्या जवळ असलेल्या पश्चिमेकडील मॅक्लॉन्ग रेल्वे मार्केटचा आहे. या बाजाराच्या मधूनच ट्रेन जाते. या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, ट्रेन सुटण्याच्या काही मिनिटांपूर्वी बाजारातील सर्व लोक आपल्या दुकानातून सामान काढतात आणि ट्रेनला जाण्याचा मार्ग मोकळा करतात. ट्रेन जाताच बाजार पूर्वीप्रमाणेच पुर्वपदावर येतो. वाचा-VIDEO : आईची बॉलिंग आणि मुलाची बॅटिंग, तुमच्या आयुष्यातही आला असेल असा क्षण! वाचा-ट्रेनरने Gym मालकावर सत्तुरने केले सपासप 17 वार, हत्येचा थरकाप उडवणार VIDEO वाचा-गर्लफ्रेंड पाहिजे! चंद्रावर फिरायला सज्ज झालेल्या अब्जाधीशाने दिली जाहिरात वाचा-हेल्मेट घालून चक्क श्वानानं केला बाईकवरून प्रवास, VIDEO VIRAL दरम्यान ही ट्रेन दिवसातून 8 वेळा या बाजारातून जाते. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ ड्रोन कॅमेऱ्यातून टिपलेला आहे. हा व्हिडिओ एका युझरने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. व्हिडिओ सोशल मीडिया मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी व्हिडिओ पाहिला आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Video viral

    पुढील बातम्या