मराठी बातम्या /बातम्या /Viral /'सेकंड हँड जवानी' गाण्यावर मंदिरात तरुणीचा धुमाकूळ; Video Viral झाल्यानंतर परिसरात खळबळ

'सेकंड हँड जवानी' गाण्यावर मंदिरात तरुणीचा धुमाकूळ; Video Viral झाल्यानंतर परिसरात खळबळ

तरुणी मंदिर परिसरात या गाण्यावर नाचत होती. या डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तिच्याविरोधात कारवाईची मागणी केली जात आहे.

तरुणी मंदिर परिसरात या गाण्यावर नाचत होती. या डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तिच्याविरोधात कारवाईची मागणी केली जात आहे.

तरुणी मंदिर परिसरात या गाण्यावर नाचत होती. या डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तिच्याविरोधात कारवाईची मागणी केली जात आहे.

छतरपुर, 26 सप्टेंबर : इंदूरनंतर मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh News) छतरपुरमध्ये एका तरुणीचा व्हिडीओ व्हायरल (Video Viral) झाला आहे. या व्हिडीओमध्ये तरुणी मंदिराच्या गेटवर डान्स करताना दिसत आहे. डान्स करणाऱ्या तरुणीचं नाव आरती साहू असल्याचं सांगितलं जात आहे. हा व्हिडीओ व्हायरल (Dance Video Viral) झाल्यानंतर लोकांनी यावर राग व्यक्त केला आहे. आरती साहू रील्स अभिनेत्री आहे. ती छतरपूरमध्ये राहते. हिंदू संघटनेने या व्हिडीओवरुन एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे. (Arti Sahus filmy Dance in the temple)

छतरपुरमध्ये आरती साहू नावाची रील्स एक्टरने मंदिराच्या गेटवर एक शॉर्ट व्हिडीओ केला आहे. हा व्हिडीओ जन टोरिआ मंदिराच्या परिसरात शूट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आरती साहूने सोशल मीडियावर पोस्ट केला होता. व्हिडीओ पोस्ट झाल्यानंतर वाद सुरू झाला. यासोबतच हिंदू संघटनेच्या लोकांनी विरोध सुरू केला आहे. कारवाई करण्याबाबत पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. मंदिराच्या महंतानेही याला विरोध केला आहे. (Madhya Pradesh young woman filmy dance in the temple Outrage among the people after video goes viral)

कोण आहे आरती साहू...

आरती साहू एक व्हिडीओ क्रिएटर आहे. ती मध्य प्रदेशातील छतरपुर येथे राहणारी आहे. इन्स्टाग्रामवर 20 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. सोबतच ते फेसबुक आणि यूट्यूबवरही रील्स पोस्ट करते. आरतीला लाखो लोक फॉलो करीत असल्याचं तिच्या अकाऊंटवरुन दिसून येत आहे.

मंदिरात डान्स केल्यामुळे टेन्शन वाढलं..

बजरंग दलसह अनेक हिंदू संघटना सोशल मीडियावर आरतीच्या विरोधात उतरली आहेत. त्यामुळे येत्या काळात आरतीच्या अडचणी वाढू शकतात. यापूर्वीदेखील आरती साहूवर अश्लीलतेसंदर्भात आरोप लावण्यात आले आहेत. मात्र मंदिराच्या समोर डान्स केल्यामुळे वाद वाढला आहे.

" isDesktop="true" id="609402" >

येथील नागरिकांनी पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार केली आहे. अद्याप तरी आरतीवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. आरती छतरपुर जिल्ह्यात राहणारी असून इन्स्टाग्रामवरुन त्यांची कमाई होते. या व्हिडीओला हजारो लाइक्स आणि लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.

हे ही वाचा-पैसे मागणाऱ्या मेहुण्यांकडे नवरदेवाची अजब मागणी; ऐकून मंडपात पिकला हशा, VIDEO

बजरंग दलाचे सौरभ खरेंनी सांगितलं की, या प्रकरणात पोलिसांकडे तक्रार तर केली जाईलच शिवाय हिंदू धर्माचा अपमान केल्याप्रकरणात एफआयआरदेखील दाखल करण्यात येईल.

First published:
top videos

    Tags: Dance video, Madhya pradesh, Viral video.