वडिलांचं नाव 'मध्यप्रदेश', मुलाचं नाव 'भोपाळ'... अनोखी आहे नाव ठेवण्याची ही पद्धत

वडिलांचं नाव 'मध्यप्रदेश', मुलाचं नाव 'भोपाळ'... अनोखी आहे नाव ठेवण्याची ही पद्धत

धार जिल्ह्यात जन्म झालेले मध्यप्रदेश सिंह सध्या झाबुआ चंद्रशेखर आझाद शासकीय महाविद्यालयात अतिथी प्राध्यापक म्हणून काम करत आहेत.

  • Share this:

मनावर तहसील येथीलभमोरी गावात राहणारे मध्यप्रदेश सिंह यांनी सांगितलं की त्यांचं हे अनोखं नाव त्यांच्या वडिलांनी ठेवलं. एवढंच नाही तर सिंह दहावीत गेले तेव्हा त्यांनी स्वतःच्या मुलाचं नाव भोपाळ सिंह ठेवण्याचं निश्चित केलं होतं. ते पुढे म्हणाले की, जर माझं नाव मध्यप्रदेश असू शकतं तर माझ्या मुलाचं नावही भोपाळ सिंह असंच असलं पाहिजे.

मध्यमवर्गीय घरात मध्यप्रदेश सिंह यांचा जन्म झाला. या अनोख्या नावामुळे जन्मापासूनच ते परिसरात प्रसिद्ध झाले. धार जिल्ह्यात जन्म झालेले मध्यप्रदेश सिंह सध्या झाबुआ चंद्रशेखर आझाद शासकीय महाविद्यालयात अतिथी प्राध्यापक म्हणून काम करत आहेत. नऊ भावा- बहिणींच्या कुटुंबात मध्यप्रदेश सिंह हे सर्वात लहान आहेत. यामुळेच त्यांचं नाव घरातील सर्व सदस्यांनी मिळून ठरवलं.

1991 मध्ये धार जिल्ह्यातील बाग प्राथमिक शाळेत नाव नोंदवण्यासाठी शासकीय दस्तावेजात नावाची सर्वातआधी नोंद झाली. मध्यप्रदेश सिंह हे आपलं नाव सांगताना सिंह यांना प्रचंड अभिमान वाटतो. त्यांचा जन्म 5 सप्टेंबर 1985 मध्ये शिक्षक दिनाच्या दिवशी झाला होता.

मध्यप्रदेश सिंह आणि त्यांची पत्नी यांचं लव्हमॅरेज झालं. दोघं एकमेकांना कॉलेजच्या दिवसांपासून ओळखत होते. त्यांच्या पत्नीने सांगितले की, कॉलेजमध्ये जेव्हा पहिल्यांदा त्यांचं नाव ऐकलं तेव्हा सुरुवातीला थोडं विचित्र वाटलं. पण नंतर जेव्हा आमची मैत्री वाढली तेव्हा नावाचं काही वाटलं नाही. आज आम्ही सुखाने संसार करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 2, 2019 01:01 PM IST

ताज्या बातम्या