Home /News /viral /

VIDEO : आराम बसलेल्या हरणाला लागली वाघाची चाहूल, शिकारीच्या खेळात कुणी दिली हुल

VIDEO : आराम बसलेल्या हरणाला लागली वाघाची चाहूल, शिकारीच्या खेळात कुणी दिली हुल

दोन वाघांकडून हरणाची शिकार, पेंच उद्यानातील थरारक VIDEO VIRAL

    पेंच, 01 डिसेंबर: मध्य प्रदेशातील पेंच नॅशनल पार्कमधला एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. वाघ आणि हरणाच्या शिकारीचा खेळ या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. हा शिकारीचा खेळ पाहून युझर्सनीही आश्चर्य व्यक्त केलं. भारतीय वन सेवा अधिकारी सुशांत नंदा यांनी 29 डिसेंबर रोजी हा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला होता. 13 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये दोन वाघ एका हरणाची शिकार करत असल्याचं पाहायला मिळालं. सोशल मीडियावर हा व्हिडिओ खूप शेअर होत आहे. या व्हिडिओमध्ये खास गोष्ट अशी आहे की दोन वाघ कधीच एका सावजाची शिकार करत नाहीत. या व्हिडिओमध्ये मात्र दोन वाघ मिळून हरणाची शिकार करण्याच्या प्रयत्नात आहेत. सुशांत नंदा यांनी हा व्हिडिओ शेअर करताना म्हटलं आहे. हा व्हिडिओ अधिक व्हायरल होण्याचं कारणच मुळात हे आहे की दोन वाघ एका सावजाची शिकार करताना पाहायला मिळत आहेत. हे दुर्मीळ दृश्य तुम्ही या व्हिडिओत पाहिलं असेल. सुरुवातीला एक वाघ आपल्या सावजावर नजर रोखून आहे. हरणाला चाहूल लागताच हरीण पळ काढतं. आपला जीव वाचवण्यासाठी हरीण वायुवेगानं धावत आहे. तर एका वाघामागून दुसरा वाघ त्याच हरणाची शिकार करण्यासाठी वेगान पळताना दिसतोय. दोन वाघ एकाच हरणाच्या मागे पाठलाग करताना पाहायला मिळाले. विशेष बाब म्हणजे 13 सेकंदाचा हा व्हिडिओ संपेपर्यंत वाघाच्या तावडीत हरिण सापडत नाही. हरीण आपला जीव वाचवण्यात यशस्वी होतं. एकाच सावजावर दोन वाघ एकाच वेळी नजर ठेऊन असावेत त्यामुळे हा प्रकार घडला असेल असंही काही युझर्सचं म्हणणं आहे. तर काही युझर्सनी ट्वीन्स असतील किंवा वाघ आणि बछडा असू शकतात का? असा सवालही उपस्थित केला आहे. मात्र ह्या व्हिडिओमध्ये दोन मोठे वाघ एकाच सावजाच्या म्हणजे हरणाची शिकार करण्यासाठी जीव तोडून पळत आहे. तर हरीण आपला जीव वाचवण्यासाठी दोघांच्या या शिकारीच्या खेळात 13 सेकंदाच्या व्हिडिओमध्येतरी हरीण जीव वाचवण्यात यशस्वी झाल्याचं दिसतं आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Madhya pradesh, Pench

    पुढील बातम्या