भोपाळ, 14 जानेवारी : दुकानात (Shop) गेल्यावर समोर एखादं पेन दिसल्यानंतर ते कसं लिहितं हे पाहण्यासाठी ते हातात घ्यावं आणि चुकून आपल्या खिशात टाकावं अगदी तसाच एका चोरट्यानं मोबाईल चोरला (mobile robbery) आहे. तब्बल 25 हजार रुपयांचा मोबाईल (mobile) घेऊन चोरटा पसार झाला आहे. त्यानं आपलं डोकं लढवून चोरी केली खरी पण त्याचा हा प्रताप सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. चोरीचा हा व्हिडीओ (video) सध्या सोशल मीडियावर (social media) व्हायरल (viral) होतो आहे.
मध्य प्रदेशच्या (madhya pradesh) जबलपूरमधील ही घटना आहे. जयंती मार्केटमधील सागर मोबाईल दुकानात ही व्यक्ती मोबाईल फोन दुरूस्ती करण्याचा बहाण्यानं मोबाईल दुकानात गेली आणि एका महागड्या फोनवर त्यानं डल्ला मारला आणि याची कल्पनाही कुणाला नव्हती.
व्हिडीओत पाहू शकता. ही व्यक्ती एका बाजूला एकटी उभी आहे. तर दुसऱ्या बाजूला इतर ग्राहक आहेत. दुकानातील विक्रेत्यांचं लक्ष याच ग्राहकांकडे आहे. व्यक्ती थोडावेळ विक्रेते आणि इतर ग्राहकांकडे नजर ठेवतो. त्यानंतर डिस्प्लेसाठी ठेवलेला मोबाईल हातात घेतो. मोबाईल पाहत असल्याचं दाखवतो आणि कुणाचंही लक्ष नाही हे पाहून तो आपल्या खिशात घालून तिथून फरार होतो.
हे वाचा - VIDEO काढण्याच्या नादात बिबट्याच्या जवळ गेला आणि... काळजाचा ठोका चुकवणारं दृश्यं
दुकानाच्या मालकानं सांगितलं, दहा मिनिटं ही व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारचे मोबाईल एक्सेसरीज पाहते. त्यानंतर विक्रेता त्या व्यक्तीकडे पाठ करून दुसऱ्या ग्राहकाशी बोलत होती. तेव्हाच संधी साधून त्यानं महागडा मोबाईल हातात घेतला आणि आपल्या खिशात ठेवला. या मोबाईल फोनची किंमत 25 हजार रुपयांपेक्षाही जास्त आहे. चोरी झाल्याचं समजताच दुकान मालकानं चोराला शोधण्याचा प्रयत्न केला पण तो काही सापडला नाही.
हे वाचा - फोटो काढताना लाजली हत्तीण; फोटोग्राफर्सची माहुताकडे करू लागली तक्रार; पाहा VIDEO
दुकानातील चोरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अखेर मालकानं सीसीटीव्ही कॅमेरा तपासून पोलिसांना हे फुटेज दिले. पोलिसांनी गुन्हा नोंदवून सीसीटीव्ही फुटेजनुसार चोराचा शोध सुरू केला आहे. त्याचे फोटो सर्वत्र लावण्यात आले आहेत. इतर पोलीस ठाण्यातही पाठवले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.