Home /News /viral /

हातात तलवारी घेऊन 2 बहिणी घोड्यावरून गेल्या सासरी, नवरदेवाच्या दारात नाचून घातला धिंगाणा!

हातात तलवारी घेऊन 2 बहिणी घोड्यावरून गेल्या सासरी, नवरदेवाच्या दारात नाचून घातला धिंगाणा!

मध्य प्रदेशमधील खंडवा येथे लग्नात एक तरुणीने ग्रॅण्ड एण्ट्री घेत सर्वांनाच चकित केले.

    खंडवा, 25 जानेवारी : मध्य प्रदेशमधील खंडवा येथे लग्नात एक तरुणीने ग्रॅण्ड एण्ट्री घेत सर्वांनाच चकित केले. दोन बहिणींनी आपली वरात काढत नवरा मुलाच्या दारात पोहचल्या. साक्षी पाटीदार आणि सृष्टी पाटीदार असे या बहिणींचे नाव असून त्यांनी हातात तलवार घेत, ढोल ताशांसर वरत काढली. या दोन बहिणींची मिरवणूक पाहून सर्व नातेवाईक आश्चर्यचकित झाले. वधू मंडपात वर आपल्या वधूची वाट पाहत होता. पाटीदार समाजाच्या परंपरेनुसार दोन्ही बहिणींचे लग्न झाले. वाचा-VIDEO : रूपेरी पड्यावरचं नाही तर 'रोबो तानाजी'चाही जगभरात डंका वाचा-स्टार खेळाडूनं 13 वर्षीय मुलीला केलं किस, त्यानंतर मागितली माफी; VIDEO VIRAL 22 जानेवारीला या दोघांचे लग्न मोठ्या थाटामाटात झाले. एएनआयशी बोलताना वधू सृष्टी म्हणाली, "मला या समाजाचा भाग असल्याचा अभिमान वाटतो आणि आम्ही ही परंपरा पाळत आहोत." तर, मुलींचे वडील अरुण यांनी, "ही 400- 500 वर्षाची परंपरा आहे. आम्ही 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' च्या समर्थनार्थ हे पुढे करत आहोत. या देशातील मुलींशी समान वागणूक दिली पाहिजे. आम्हाला आमच्या परंपरेनुसार हा संदेश द्यायचा आहे आणि तो पुढेही सुरू ठेवू”, असे सांगितले. वाचा-प्रार्थनेच्या वेळी लॉलीपॉप खात होता मुलगा, असा Video की अनुपम खेरही झाले इमोशनल
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या