Home /News /viral /

ऑनड्युटी Moonwalk करणाऱ्या 'त्या' Traffic police चा Video पुन्हा Viral; यामागील स्टोरी तुम्हाला माहिती आहे का?

ऑनड्युटी Moonwalk करणाऱ्या 'त्या' Traffic police चा Video पुन्हा Viral; यामागील स्टोरी तुम्हाला माहिती आहे का?

मायकल जॅक्सनसारखं (Michael Jackson) मूनवॉक (moonwalk) करून वाहतूक नियंत्रित करणाऱ्या तो ट्रॅफिक पोलीस (Traffic police) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

  इंदूर, 10 डिसेंबर : वाहतूक पोलीस (Traffic police) म्हटलं की त्यांच्याजवळ असते एक शिट्टी. ही शिट्टी वाजवून ते ट्रॅफिक कंट्रोल करत असतात. पण सोशल मीडियावर (social media) एका अशा वाहतूक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, जो शिट्टी नाही तर मूनवॉक करून ट्रॅफिक कंट्रोल करतो. मायकल जॅक्सनसारखं (Michael Jackson) मूनवॉक (moonwalk) करून वाहतूक नियंत्रित करणाऱ्या तो पोलीस पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. रणजीत सिंह (Ranjeet singh) असं या ट्रॅफिक पोलिसाचं नाव आहे. मध्य प्रदेशच्या (Madhya pradesh) इंदूरमधील (Indore) हा ट्रॅफिक पोलीस. आपल्या अनोख्या स्टाईलने सर्वांचं लक्ष वेधून घेतो. ट्रॅफिक पोलीस रणजित सिंह ट्रॅफिक कंट्रोल करण्यासाठी डान्स करत असल्याने ते इंदोर शहरामध्ये चांगलेच प्रसिद्ध झाले आहेतच. पण सोशल मीडियावर त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने ते सोशल मीडियावरही प्रसिद्ध झाले आहेत. पुन्हा एकदा त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. official_viralclips इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
  गेल्या 16 वर्षांपासून ते ट्रॅफिक कंट्रोल करण्यासाठी मायकल जॅक्सनच्या मूनवॉकचा  वापर करत आहे. ते असं काय करतात यामागे एक स्टोरीसुद्धा आहे. हे वाचा - आकाशात तडफडत होता पक्षी, वाचवण्यासाठी आला 'देवदूत'; पाहा सुटकेचा थरारक VIDEO एनडीटीव्हीशी बोलताना रणजित सिंह यांनी सांगितले की, '16 वर्षांपासून मी डान्स करत ट्रॅफिक कंट्रोल करत आहे. एका घटनेने मला बदललं. त्यादिवशी मला कम्युनिकेशन डिव्हाइसवरून एका ठिकाणी अपघात झाला असून गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तिथे जा असा आदेश आला. मी घटनास्थळी दाखल झालो तेव्हा मला कळाले की अपघातात मृत्यू झालेली व्यक्ती माझा मित्र आहे. रागाच्या भरात रस्ता ओलांडून जात असताना माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं तुझी हालचाल पाहून लोक थांबले आहेत. त्यानंतर मी आपल्या कामात डान्सचा वापर करण्यास सुरुवात केली. मूनवॉकच्या माध्यमातून मी ट्रॅफिक कंट्रोल करायला लागतो.' रणजित सिंह यांनी पुढे सांगितले की, 'मला सुरुवातीपासूनच डान्सची आवड होती पण गरिबीमुळे मला डान्सची आवड पूर्ण करता आली नाही. माझा डान्स प्रवाशांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यास मदत करतो. तसंच प्रवासी वाईट मनस्थितीत असतात माझा डान्स पाहून त्यांना आनंद होतो', असंदेखील त्यांनी सांगितलं. हे वाचा - OMG! डोळ्याची पापणी न मिटता एकटक तासभर सूर्याकडे बघत राहिला हा व्यक्ती रणजित सिंह अनोख्या स्टाईलने ट्रॅफिक कंट्रोल करत असल्याने वरिष्ठ अधिकारी देखील त्यांच्यावर खूश आहेत. वरिष्ठ अधिकारी प्रशांत चौबे यांनी सांगितले की, 'रणजित सिंह आपल्या कामात पारंगत आहे. ज्या चौकामध्ये ते कार्यरत आहेत त्याठिकाणी वाहनांची रहदारी चांगली असते. त्यांची ही स्टाईल आहे ज्याद्वारे ते नागरिकांना थांबवतात पण ते त्यांच्याशी भांडत नाहीत. या कामाबद्दल ट्रॅफिक पोलिस रणजीत सिंह यांना बेस्ट ट्रॅफिक मॅनेजमेंटसाठी पुरस्कार देण्यात आला आहे. ते ट्रॅफिक पोलिसांना चांगल्या ट्रॅफिक मॅनेजमेंटसाठी ट्रेनिंग सुद्धा देतात.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Dance video, Traffic police, Viral, Viral videos

  पुढील बातम्या