मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIDEO - Paytm वरून भीक, कोट्यवधींची प्रॉपर्टी; आता हेलिकॉप्टरही खरेदी करणार भिकारी

VIDEO - Paytm वरून भीक, कोट्यवधींची प्रॉपर्टी; आता हेलिकॉप्टरही खरेदी करणार भिकारी

ऑनलाईन भीक घेणारा भिकारी झुनझुन बाबाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

ऑनलाईन भीक घेणारा भिकारी झुनझुन बाबाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

ऑनलाईन भीक घेणारा भिकारी झुनझुन बाबाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

    भोपाळ, 09 ऑगस्ट : आपलं आलिशान घर असावं, आलिशान गाडी आपली संपूर्ण लाइफ आलिशान असावी, असं कुणाला वाटत नाही. यासाठी लोक दिवसरात्र मेहनत करून पैसे जमवतात. पण तरी काही लोकांना ही स्वप्न पूर्ण करणं जमत नाही. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल एक भिकारी ज्याने भीक मागून मागून पैसे जमवले. त्याच पैशांतून त्याने कोट्यवधींची प्रॉपर्टी घेतली आणि आता तो हेलिकॉप्टर खरेदी करण्याच्या तयारीत आहे. सध्या डिजीटल युग आहे. त्यामुळे पैशांची देवाण-घेवाण आनलाईनच होते. आर्थिक व्यवहारांसाठी बरेच पेमेंट अॅप आहेत. ज्याचा बरेच लोक फायदा घेत आहेत. अगदी एक भिकारीही डिजीटल झाला आहे. जो पेटीएममार्फत भीक मागतो. झुनझुन बाबा असं त्याचं नाव. मध्य प्रदेशातील हा झुनझुन बाबा सध्या चर्चेत आला आहे. कारण तो पेटीएमवरून भीक घेतो. अशीच भीक मागून त्याने कोट्यवधींची प्रॉपर्टी घेतली आहे आणि आता हेलिकॉप्टर खरेदी करण्याचं स्वप्न आहे. हे वाचा - वडिलांनी खरेदी केलेली सेकंड हॅंड सायकल पाहून मुलाचा आनंद गगनात मावेना; व्हिडिओ व्हायरल मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्यातील सुरखी येथील हा झुनझुन बाबा. या झुनझुन बाबाचा व्हिडीओही समोर आला आहे. त्याने सांगितलं की, त्यांच्या मुलाच्या फोनमध्ये पेटीएम इन्स्टॉल केलं आहे. त्याला हे पैसे जातात आणि जेव्हा झुनझुन बाबाला गरज असते तेव्हा तो त्याला पैसे देतो. व्हिडीओत या बाबाने दिलेल्या माहितीनुसार त्याने 40-50 लाख रुपये जमवले आहेत. इंदौर आणि सागरमध्ये त्याची प्रॉपर्टी आहे.आता फक्त त्यांला हेलिकॉप्टर खरेदी करायचं आहे.हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो पैसे जमवत आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Viral, Viral videos

    पुढील बातम्या