मुसळधार पावसात पिकनिकला जाणं जीवावर बेतलं, अचानक पाणी वाढलं आणि...पाहा VIDEO

मुसळधार पावसात पिकनिकला जाणं जीवावर बेतलं, अचानक पाणी वाढलं आणि...पाहा VIDEO

ग्रामस्थांनी धैर्य दाखवलं नसतं तर मोठा अनर्थ घडला असता.

  • Share this:

इंदूर, 21 सप्टेंबर : कोरोना, लॉकडाऊन आणि त्यानंतर मुसळधार पाऊस यामुळे पर्यटनाला जाण्यासाठी असलेल्या ठिकाणांवर बंदी आली. 8 महिने घरात राहून वैतागलेल्या अनेक कुटुंबियांना आता पर्यटनाचे वेध लागले आहेत. मात्र प्रशासनाकडून अनेक ठिकाणांवर अद्यापही बंदी असल्यानं अशा ठिकाणी जाता येत नाही. अनेकदा अशावेळी नियम मोडून किंवा चोरून पर्यटन स्थळांवर फियाला जातात. असेच काही तरुण तरुणी घरी बसून कंटाळल्यामुळे फिरायला निघाले आणि नको ते धाडस त्यांच्या अंगाशी आलं.

तरुण-तरुणी फिरायला गेले असताना मुसळधार पाऊस पडत असल्यानं परिसरात पाणी साठलं आणि पूरस्थिती निर्माण झाली. पोलिसांची नजर चुकवून एक तरुण-तरुणी  धबधब्यावर जात होते. त्याच वेळी आजूबाजूच्या नाल्यातील पाणी वाढल्यानं पूरस्थिती निर्माण झाली. त्यामध्ये ही कार अडकली आणि वाहून जात असताना तरुण मुलं गाडीत अडकली. काय करावं हे सुचेना इतक्यात स्थानिकांची नजर त्या गाडीवर पडली.

गाडी लॉक झाल्यामुळे गाडीचं दार उघडणं शक्य नव्हतं. स्थानिकांनी काच उघडून या तरुणांचा जीव वाचवला. ग्रामस्थांनी मोठ्या धौर्यानं या तरुणांना सुखरुप बाहेर काढलं आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हे वाचा-VIDEO : ...आणि अक्षरश: चिमुकल्यानं दिली मृत्यूला हुल; 100 लोक अडकले पण तो वाचला

पोलिसांची नजर चुकवून हे 5 जण धबधब्यावर फिरायला जात होते. त्याचवेळी रस्त्यातून जात असताना हा धक्कादायक प्रकार घडला. विश्वजितसिंग तोमर यांनी दिलेल्या माहितीनुसार तिछा धबधब्याकडे जाताना एक गाडी पुराच्या पाण्यात अडकली. या कारमध्ये चार तरुण आणि एक तरुणी असल्याची माहिती मिळाली आहे. हे सगळेजण इंदूरचे रहिवासी आहेत.

ग्रामस्थांनी धैर्य दाखवलं नसतं तर मोठा अनर्थ घडला असता. ही कार पाण्यासोबत वाहून गेली असती. सगळे नियम धाब्यावर बसून हे फिरायला निघालेल्या तरुण-तरुणींवर काय कारवाई होणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: September 21, 2020, 10:20 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading