सागर, 19 डिसेंबर : नेहमी मोकाट बैल किंवा जनावरांचा रस्त्यावर चालेला धुमाकूळ आणि हल्ल्याच्या अनेक घटना समोर येत असतात. संकटातून बाहेर आलेल्या आणि बिथरलेल्या म्हशीनं लोकांवर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.
पाण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात म्हैस पडली आणि याची माहिती प्रशासन आणि वन विभागाला समजली. त्यांनी मिळून क्रेनच्या सहाय्यानं या म्हशीचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं. या म्हशीला सुखरुप बाहेर काढलं खरं पण घाबरलेली आणि संतापलेल्या म्हशीनं पोलिसासह काही जणांवर हल्ला देखील केला आहे. या हल्ल्यात पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.
खड्ड्यात पडलेल्या म्हशीला रेस्क्यू केलं तर तिने केला पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला pic.twitter.com/lv9jAR06eg
मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संतापलेल्या म्हशीनं थेट पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला केला. सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की रस्त्यावर गाडीनं जात असणाऱ्या नागरिकांवरही या म्हशीनं हल्ला केला आहे. या हल्ल्यात दुचाकीस्वार तोल जाऊन खाली कोसळताना दिसत आहेत.
य़ा घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या म्हशीला रेस्क्यू केल्यानंतर संतापाच्या भरात तिने हा हल्ला केला आणि मोठी खळबळ उडाली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.