मराठी बातम्या /बातम्या /Viral /Watch Video: हनुमान जयंतीच्या शोभा यात्रेत मुस्लिम बांधवांचं कौतुकास्पद कृत्य, हिंदू भाविकांसाठी केलं 'हे' काम

Watch Video: हनुमान जयंतीच्या शोभा यात्रेत मुस्लिम बांधवांचं कौतुकास्पद कृत्य, हिंदू भाविकांसाठी केलं 'हे' काम

मुस्लिम समुदायाने शोभायात्रा जवळ आल्यानंतर हनुमान जयंती रॅलीतील (Hanuman Jayanti rally) भाविक आणि हनुमानाच्या रथावर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केल्याचं दिसतंय.

मुस्लिम समुदायाने शोभायात्रा जवळ आल्यानंतर हनुमान जयंती रॅलीतील (Hanuman Jayanti rally) भाविक आणि हनुमानाच्या रथावर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केल्याचं दिसतंय.

मुस्लिम समुदायाने शोभायात्रा जवळ आल्यानंतर हनुमान जयंती रॅलीतील (Hanuman Jayanti rally) भाविक आणि हनुमानाच्या रथावर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केल्याचं दिसतंय.

मध्य प्रदेश, 18 एप्रिल: देशात गेल्या काही दिवसांपासून धर्मावरून राजकारण चांगलंच तापलंय. हिंदू-मुस्लिम सणांवरून वाद होताना दिसत आहेत. अशातच भोपाळमध्ये हिंदू-मुस्लिम सलोखा पाहायला मिळाला. हनुमान जयंतीच्या मिरवणुकीचं मुस्लिमांनी फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करून स्वागत केलं.

मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये (Madhya Pradesh Bhopal) धार्मिक सलोख्याचं एक उत्तम उदाहरण पाहायला मिळालं. एका मुस्लिम समुदायाने (Muslim Community) धार्मिक सलोख्याचं उदाहरण प्रस्थापित करत हनुमान जयंतीनिमित्त निघालेल्या शोभा यात्रेचं फुलांच्या पाकळ्यांचा (Flower Petals) वर्षाव करत स्वागत केलं. या संदर्भात ANI वृत्तसंस्थेनं एक व्हिडिओ शेअर केलाय. यात मुस्लिम समुदायाने शोभायात्रा जवळ आल्यानंतर हनुमान जयंती रॅलीतील (Hanuman Jayanti rally) भाविक आणि हनुमानाच्या रथावर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केल्याचं दिसतंय. हिंदू समुदायाने (Hindu devotees) हनुमान जयंतीनिमित्त हनुमानाची मोठी मूर्ती (Hanuman idol) रथात ठेवून शोभायात्रा काढली होती.

अपघातानंतर सायकल रायडरच्या एका निर्णयाने पलटली बाजी! पराक्रमानंतर Super Mom चं होतंय कौतुक

द क्विंटच्या वृत्तानुसार, भोपाळमधील तलैया येथून रथयात्रा काढण्यात आली आणि ती मुस्लिम वस्त्यांतून गेली. या रॅलीच्या पार्श्वभूमीवर या भागात मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. या भागात मिरवणुकीदरम्यान, अनुचित प्रकार घडेल अशी भीती होती. परंतु, तिथे याउलट चित्र पाहायला मिळालं. मुस्लिम समुदायाने यात्रेतील भाविक आणि हनुमानाच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी केली आणि पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचं वाटपही केलं. द क्विंटच्या वृत्तानुसार, मुस्लिम समुदायातील सदस्यांनी सांगितलं की, दोन समुदायांमध्ये बंधूभाव वाढवण्याचा हा एक प्रयत्न होता.

काही दिवसांपूर्वी, पश्चिम बंगालमधील सिलिगुडी (Siliguri) येथे रामनवमीच्या मिरवणुकीत (Ram Navami Procession) काही मुस्लिम (Muslim) तरुणांनी हिंदू भाविकांना पाण्याच्या बाटल्यांचे वाटप केलं आणि त्यांना मिठी मारून शुभेच्छा दिल्या. त्यानंतर हिंदू भाविकांनी त्यांचे आभार मानले, अशी बातमी एएनआयनं दिली होती.

पाणी वाटप करणार्‍या स्वयंसेवकांपैकी एक शाहनेवाज हुसेन यांनी ANI ला सांगितलं की, “विविध समुदायांतील लोकांमध्ये आपुलकी निर्माण करण्यासाठी आम्ही पाण्याच्या बाटल्यांचं वाटप करण्याचा निर्णय घेतला.” त्यांनी पुढे सांगितले की, त्यांनी रामनवमीच्या मिरवणुकीत सहभागी झालेल्या भाविकांना 4,000 हून अधिक पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचं वाटप केलं. तरुणांनी एक लहान शिबिर आयोजित केलं आणि पाणी वाटप करण्याचं ठरवलं. या मिरवणुकीतील सहभागी लांब पल्ल्याचा प्रवास करत होते, त्यामुळे त्यांना मदत करण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला. यावेळी हुसेन यांनी देशातील विविधतेतील एकतेवर भाष्य केलं आणि रमजानच्या (Ramzan) पवित्र महिन्यात रामनवमीच्या उत्सवात भाग घेण्यास मला आनंद झाला, असं ते म्हणाले.

याच शोभायात्रेतील पुष्पवृष्टीचे अन्य व्हिडिओही विविध ट्विटर यूजर्सनी सोशल मीडियावर अपलोड केले आहेत.

First published:
top videos

    Tags: Bhopal News, Madhya pradesh