Home /News /viral /

...आणि बघता बघता पार्क केलेल्या 3 गाड्या गेल्या वाहून, पाहा LIVE VIDEO

...आणि बघता बघता पार्क केलेल्या 3 गाड्या गेल्या वाहून, पाहा LIVE VIDEO

या व्हिडीओमध्ये धबधब्यातून गाड्या वाहून जाताना दिसत आहे. दरम्यान, अथक प्रयत्नानंतर दोन गाड्या बाहेर काढण्यात गावकऱ्यांना यश आले आहे, तर एका गाडीचा शोध अजूनही सुरू आहे.

    धार (मध्य प्रदेश) 14 सप्टेंबर : मध्य़ प्रदेशमध्ये पावसाचा जोर वाढत आहे. मात्र अशा परिस्थितीत लोकं बाहेर फिरण्यासाठी जात आहेत. धार जिल्ह्यातील ढल पंचायतच्या जोगीबिडा धबधब्याजवळ एक भयंकर प्रकार घडला. रविवारी पिठमपूरच्या इंदूर येथून लोक येथे पिकनीकसाठी आले होते. मात्र अचानक धबधब्यात तीन कार वाहून लागल्या. याचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये धबधब्यातून गाड्या वाहून जाताना दिसत आहे. दरम्यान, अथक प्रयत्नानंतर दोन गाड्या बाहेर काढण्यात गावकऱ्यांना यश आले आहे, तर एका गाडीचा शोध अजूनही सुरू आहे. वाचा-VIDEO : समुद्रात बुडत होता 17 वर्षीय तरुण मात्र हुशारीने थोडक्यात बचावला वाचा-VIDEO रस्त्यावरची कार बघता बघता गेली वाहून; अवघ्या तासाभराच्या पावसाचा कहर धार जिल्ह्यातील नालाचा विकासखंडाच्या ग्रामपंचायत ढळ अंतर्गत जोगी भरक धबधबा खूप प्रसिद्ध आहे. शनिवार आणि रविवारी येथे मोठ्या प्रमाणावर पर्यटक असतात. इंदूर, पिथमपूर, महू येथून मोठ्या संख्येने पर्यटक येथील लोकं पर्यटनासाठी येथे येतात. रविवारीही मोठ्या संख्येने पर्यटक उपस्थित असताना हा प्रकार घडला. अचानक पाण्याची पातळी वाढली, आणि 3 गाड्या वाजून गेल्या. वाचा-वीज कोसळताना कधी पाहिली का? कल्याणच्या दुर्गाडी चौकातला VIDEO व्हायरल उपस्थित लोकांना पाण्याची पातळी एवढी वाढेल याची कल्पना नव्हती. त्यामुळे गाड्या हलवण्याआधीच त्या वाहून गेल्या. हा प्रकार घडल्यानंतर काही काळ हा परिसर बंद केला होता. तसेच, लोकांनी मुसळधार पाऊस असल्याचे धबधब्यावर येऊ नये, असे आवाहनही केले आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Video viral

    पुढील बातम्या