वॉशिंग्टन, 28 नोव्हेंबर : इन्स्टंट फूड किंवा रेडी टू इट फूड... अवघ्या काही मिनिटांतच तयार करून खाता येतील असे हे पदार्थ.... या फूड्सच्या पॅकेट्सवर ते किती मिनिटात तयार होतील, हे नमूद केलेलं असतं. तुम्हीही असे काही पदार्थ बनवले असतील. तर पाहिलं असेल की प्रत्यक्षात मात्र हे पदार्थ तयार व्हायला पाकिटावर दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ लागतो. तसं हे सर्वांना माहिती आहे पण एका महिलेने अशा फूड्सची विक्री करणाऱ्या कंपनीविरोधात तक्रार केली आहे. कंपनीवर तिने कोट्यवधी रुपयांचा दावा ठोकला आहे.
साऊथ फ्लोरिडामध्ये राहणारी ही महिला. अमांडा रामीरेज असं तिचं नाव. महिलेने स्थानिक प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की तिने मॅक अँड चीज पास्ता खरेदी केला होता. हा पास्ता मायक्रोव्हेवमध्ये बनवायचा होता. हा पास्ता ज्या पाकिटात होता, त्या पाकिटावर जी वेळ दिली आहे, ज्यापेक्षा जास्त वेळ लागल्याचं तिचं म्हणणं आहे.
हे वाचा - भाजीला काय सोनं लागलंय? भाजीची किंमत ऐकून तुम्हाला बसेल 440 वोल्टचा शॉक...
तिच्या म्हणण्यानुसार पास्ताच्या पाकिटावर रेडी इन 3.5 मिनिट्स असं लिहिलं आहे. म्हणजे इतक्या मिनिटांत हा पास्ता तयार होईल, असं सांगितलं आहे. पण प्रत्यक्षात तसं नाही. हा पास्ता तयार व्हायला यापेक्षा जास्त वेळ लागला. पाकिटावर देण्यात आलेली वेळ की खरंतर कुकिंग टाइम म्हणजे पास्त्या शिजण्याची वेळ आहे. पॅकेट खोलण्यासाठी ते बाऊलमध्ये टाकण्यापर्यंतही वेळ जातो, असं ती म्हणाली. त्यामुळे पाकिटावर रेडी इन 3.5 मिनिट्सऐवजी कुकिंग टाइम 3.5 मिनिट्स असं असायला हवं होतं, असं या महिलेचं म्हणणं आहे.
ज्या कंपनीचा हा पास्ता आहे त्या क्राफ्ट हेइन्झ कंपनीविरोधात 18 नोव्हेंबरला ती कोर्टात गेली. कंपनीने जाहिरातीतून चुकीची माहिती दिल्याचा, दिशाभूल केल्याचा आरोप तिने केला आहे. तिने कंपनीवर 5 दशलक्ष डॉलर म्हणजे जवळपास 40 कोटी रुपयांचा दावा ठोकला आहे.
हे वाचा - दारू पिऊन रस्त्यावर चालत राहिले; फिरता फिरता नशेत थेट फॉरेनला पोहोचलं कपल
एशियानेट न्यूज हिंदीच्या रिपोर्टनुसार महिलेने कंपनीविरोधात तक्रार केल्यानंतर कंपनीनेही आपली बाजू मांडली आहे. महिलेमार्फत देण्यात आलेली तक्रार चुकीची असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. आम्ही याचा विरोध करतो आणि याला उत्तर देणार, असं कंपनीने सांगितलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Food, Viral, Viral news