• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • मृत मालकाच्या आठवणीनं कुत्रा व्याकूळ; पाण्याचा घोटही न घेता 3 आठवड्यांपासून पाहतोय वाट

मृत मालकाच्या आठवणीनं कुत्रा व्याकूळ; पाण्याचा घोटही न घेता 3 आठवड्यांपासून पाहतोय वाट

एक कुत्रा खाणीच्या बाहेर बसून मागील तीन आठवड्यांपासून आपल्या मालकाची वाट पाहत (Loyal Dog Waiting for His Owner Outside Coal Mine) आहे. ही घटना सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली 27 जून : मनुष्य आणि प्राण्यांच्या मैत्रीच्या अनेक अशा कथा आहेत, ज्या कोणाचंही मन जिंकण्यासाठी पुरेशा आहेत. बर्‍याचदा आपण अशा कथा ऐकल्या किंवा डोळ्यांनी पाहिल्याही असतील. सध्या अशीच आणखी एक घटना चर्चेत आहे. ही घटना वाचून तुम्हीही प्राण्यांच्या इमानदारीचं कौतुक (Friendship Between human and Dog) कराल. मेक्सिकोमध्ये (Mexico) एक कुत्रा खाणीच्या बाहेर बसून मागील तीन आठवड्यांपासून आपल्या मालकाची वाट पाहत (Loyal Dog Waiting for His Owner Outside Coal Mine) आहे. ही घटना सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. एका माध्यमानं दिलेल्या वृत्तानुसार, या कुत्र्याच्या मालकाचा खाणीत झालेल्या स्फोटात मृत्यू झाला आहे. मात्र, या श्वानाला अजूनही आपल्या मालकाच्या परत येण्याची आशा आहे. कहइलाध्ये (Coahuila) राहाणाऱ्या या श्वानाला स्थानिक लोक कुचफलेटो (Cuchufleto) असं म्हणतात. मिळालेल्या माहितीनुसार, हा कुत्रा मागील तीन आठवड्यांपासून कोळशाच्या खाणी बाहेर बसला आहे. या कुत्र्याचा 53 वर्षीय गोंजालो क्रूज यांनी सांभाळ केला. दोघेही दररोज सोबतच खाणीपर्यंत येत असत, याच खाणीत गोंजालो क्रूज काम करायचा. राजस्थानमधील एका गावानं असा रोखला कोरोना, राज्यभरात ‘टीम सरपंच’ची चर्चा गोंजालोच्या पत्नीनं सांगितलं, की त्यांचा पती आणि कुचफलेटो दोघंही सकाळी साडेसहा वाजताच घरातून बाहेर पडायचे. यानंतर गोंजालो खाणीत कामासाठी जात असे आणि कुचफलेटो खाणीच्या बाहेरच मालकाची वाट पाहत असे. काम संपल्यानंतर दोघंही रात्री सोबतच घरी येत असे. मात्र, सहा जून रोजी या खाणीत एक दुर्घटना घडली. याच घटनेत गोंजालोचा मृत्यू झाला. या घटनेत एकूण 7 कामगारांनी आपला जीव गमावला. यात गोंजालोचाही समावेश होता. मात्र, कुचफलेटोला अजूनही आपल्या मालकाची प्रतीक्षा आहे. सुनेचा चेहरा पाहून सासूला आली चक्कर; शुद्धीवर येताच नवरीची घरातून हकालपट्टी 6 जूनपासून कुचफलेटो रोज खाणीच्या बाहेर बसून आपल्या मालकाची वाट पाहात आहे. इतकंच नाही तर त्यानं काही खाणं-पिणंही सोडलं आहे. अनेक स्थानिक लोकांचं असं म्हणणं आहे, की इथे बसून कुचफलेटो आपलं दुःख व्यक्त करतो. त्याला अनेकदा याठिकाणाहून उठवण्याचा प्रयत्नही केला. मात्र, सकाळपासून रात्रीपर्यंत तो याच जागी बसून राहातो. जोपर्यंत गोंजालोचं काम सुरू असायचं, तोपर्यंत हा श्वान तिथेच बसून मालकाची वाट पाहातो. अखेर थकून रात्री तो घरी निघून जातो मात्र दुसऱ्या दिवसी सकाळी पुन्हा याच ठिकाणी येऊन बसतो.
  Published by:Kiran Pharate
  First published: