अनुज गुप्ता/लखनऊ, 10 मार्च : हीर-रांझा, लैला-मजून, रोमिओ ज्युलिअट... प्रत्येक लव्ह स्टोरी प्यार के दुश्मन असतातच. त्या काळातच नाही तर आजही प्रेमीयुगुलांना प्रेमाची मोठी किंमत मोजावी लागते. अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. एकमेकांवर प्रेम करणाऱ्या कपलला जमावाने तालिबानी शिक्षा दिली आहे. हा भयंकर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
उत्तर प्रदेशच्या उन्नाव जिल्ह्यातील ही घटना. मलुहाखेडा गावात राहणारी तरुणी जिचं एका तरुणावर प्रेम होतं. तो तिला भेटण्यासाठी रात्री 12 च्या सुमारास आला. त्या दोघांंना एकमेकांना भेटताना त्यांच्या कुटुंबाने आणि ग्रामस्थांनी पाहिलं. त्यानंतर दोघांनीही पकडलं आणि एकाच कपड्याने त्यांना बांधलं. त्यानंतर जे घडलं ते अंगावर काटा आणणारं आहे.
एका दिवसातच नवरदेवाने आटोपला हनीमून, घरी परतताच नवरीबाईची पोलिसात धाव; FIR दाखल
दोघांनी एकत्र एका कपड्याने बांधून त्यांना सर्वांना मारहाण केली. मारहाणीमुळे कपलची अवस्था इतकी भयानक झाली की त्यांच्या तोंडातून रक्त पाहू लागलं. त्यांची अवस्था पाहून सर्वजण घाबरले आणि तिथून पळ काढला. या कपलला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
पीडितांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींचा पोलीस तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Couple, Crime, Uttar pradesh, Viral, Viral videos