गर्लफ्रेंडला भेटायला गेलेल्या प्रियकराची तिच्या घरच्यांनी धू-धू धुतलं, सकाळी त्यालाच केलं जावई

गर्लफ्रेंडला भेटायला गेलेल्या प्रियकराची तिच्या घरच्यांनी धू-धू धुतलं, सकाळी त्यालाच केलं जावई

एकमेकांशी चर्चा करून, रात्रभर मारहाण केलेल्या या तरुणाला दुसऱ्या दिवशी कुटुंबियांनी जावई करून घेतलं.

  • Share this:

रामपूर, 22 नोव्हेंबर : उत्तर प्रदेशातील रामपूरमध्ये एक विचित्र घटना घडली. मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटायला गेलेल्या प्रियकराला तरुणीच्या घरातल्यांनी पकडलं. त्यानंतर या तरुणाला एका खोलीत बंद करून धुलाई केली. दुसऱ्या दिवशी या तरुणाला कुटुंबियांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान, पोलिसांनी आपापसात हे प्रकरण मिटवण्यास सांगितले. त्यानंतर एकमेकांशी चर्चा करून, रात्रभर मारहाण केलेल्या या तरुणाला दुसऱ्या दिवशी कुटुंबियांनी जावई करून घेतलं.

रामपूर येथील एका गावात राहणाऱ्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी तरुण तिच्या घरी गेला. दोघं बऱ्याच वर्षांपासून एकमेकांसोबत होते. रात्री 12 वाजता तरुणाला कुटुंबियांनी पाहिले. त्यानंतर गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी आलेल्या या तरुणाला मुलीच्या कुटुंबियांनी मारहाण केली. तरुणाला एक खोलीत बंद करण्यात आले. घरातून विचित्र आवाज येऊ लागल्यामुळे शेजाऱ्यांनीही गर्दी केली. त्यानंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले.

वाचा-87 तासांत फिरली 208 देश फिरली ही महिला; कसा होता भटकंतीचा अनुभव? वाचा

वाचा-iPhone घेण्यासाठी 9 वर्षांपूर्वी किडनी विकली; आता अशी झाली अवस्था

यासंदर्भात अप्पर पोलिस अधीक्षक अरुण कुमार सिंह म्हणाले की, या प्रकरणाची तक्रार येताच मुलाला पोलीस ठाण्यात बोलविण्यात आले. मुलाच्या कुटुंबातील लोकही आले. ते म्हणाले की, दोन्ही कुटुंबांना आपापसात हे प्रकरण मिटवण्यास सांगितले. यानंतर, मुला-मुलीच्या कुटुंबियांनी या दोघांचे लग्न ठरवले आणि त्याचदिवशी एका छोट्या मंदिरात त्यांचा विवाह झाला.

Published by: Priyanka Gawde
First published: November 22, 2020, 9:43 AM IST
Tags:

ताज्या बातम्या