मराठी बातम्या /बातम्या /Viral /

प्रेमाखातर साता समुद्रापार भारतात आलेली युवती माघारी, कारण ऐकून बसेल धक्का

प्रेमाखातर साता समुद्रापार भारतात आलेली युवती माघारी, कारण ऐकून बसेल धक्का

एक विदेशी मुलगी आपल्या प्रेमाखातर भारतात आली. फेसबुकवर (Facebook) झालेल्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. आता ती घरी परतण्यासाठी आपल्या आप्त स्वकियांकडं मदत मागत आहे.

एक विदेशी मुलगी आपल्या प्रेमाखातर भारतात आली. फेसबुकवर (Facebook) झालेल्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. आता ती घरी परतण्यासाठी आपल्या आप्त स्वकियांकडं मदत मागत आहे.

एक विदेशी मुलगी आपल्या प्रेमाखातर भारतात आली. फेसबुकवर (Facebook) झालेल्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. आता ती घरी परतण्यासाठी आपल्या आप्त स्वकियांकडं मदत मागत आहे.

नवी दिल्ली, 29 मे : सात समंदर पार मै तेरे पिछे पिछे आ गई...! हे हिंदी चित्रपटातील (Bollywood Movies) गाणं तुम्ही ऐकलं असेल. पण या गाण्याची वास्तवात अनुभव देणारी एक घटना नुकतीच घडली. एक विदेशी मुलगी आपल्या प्रेमाखातर भारतात आली. फेसबुकवर (Facebook) झालेल्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. केवळ या प्रेमाखातर ही मुलगी 4622 किलोमीटरचा प्रवास करुन आपल्या प्रियकराकडे आली. मात्र त्यानंतर असं झालं की, लॉकडाऊनमुळे (Lockdown) प्रियकर चांगलाच अर्थिक अडचणीत आल्याचं पाहून या विदेशी मुलीवर असलेले प्रेमाचं गारुड क्षणार्धात उतरलं. आता ती घरी परतण्यासाठी आपल्या आप्त स्वकियांकडं मदत मागत आहे.

अशी आहे ही लव्ह स्टोरी

ही घटना उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातील मझिला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. येथील पवन नावाच्या युवकाची मैत्री फिलिपिन्समधील (Philippines) एडना नावाच्या मुलीशी झाली. फेसबुकवरुन सुरु झालेल्या या मैत्रीखातर एडना आपला देश, घर, परिवार सोडून हरदोई येथे प्रियकर पवनकडे आली. त्यानंतर ती पवनसोबत राहू लागली. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे पवनचा रोजगार गेला. यामुळे जसजशी पवनची अर्थिक स्थिती खालावू लागली, तसतसा एडनावरील प्रेमाचं गारुड उतरू लागलं.

समस्या वाढल्यानं ती आपल्या कुटुंबियांशी संपर्क करुन घरी परतण्यासाठी मदत मागू लागली. यानंतर फिलिपिन्स येथील तिच्या कुटुंबियांनी दुतावासाकडे (Embassy) मदत मागितली. फिलिपिन्स दूतावासातील अधिकाऱ्यांनी हरदोई जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधत या युवतीला शोधून काढले. त्यानंतर प्रशासकीय अधिकारी या युवतीला घेऊन जाण्यासाठी गावात आले. युवती आपल्या घरी जाऊ इच्छित होती. मात्र आपल्या प्रियकराला कोणत्याही प्रकारचा त्रास दिला जाऊ नये, याबाबत तिला चिंता होती. प्रशासनाने या युवतीला दूतावासातील अधिकाऱ्यांसोबत पाठवून दिले.

हेही वाचा- लसीकरणानंतरही UKमध्ये तिसऱ्या लाटेचा धोका, भारतावर होऊ शकतात 'हे' परिणाम

फिलिपिन्समधील या युवतीनं सांगितलं,  मी ऑगस्ट 2019 मध्ये हरदोई जिल्ह्यातील पवन याच्याकडे आले. एक वर्षानंतर लॉकडाऊनमुळे पवनची आर्थिक स्थिती खालावली. मलाही अडचणींचा सामना करावा लागत होता.  त्यामुळे मला पुन्हा फिलिपीन्सला परत जायचं होतं. तसंच भारताचा व्हिसा केवळ एका वर्षासाठी मिळाला होता. पण लॉकडाऊनमुळे मी पुन्हा फिलिपीन्सला परत जाऊ शकत नव्हते.

या संपूर्ण प्रकरणावर पश्चिम विभागाचे एएसपी कपिल देव यांनी सांगितलं, ऑगस्ट 2019 ला फिलिपिन्समध्ये राहणारी एडना नावाची युवती भारत दौऱ्यावर आली होती. या दरम्यान तिची मझिला ठाणे क्षेत्रातील रहिवासी पवनसोबत मैत्री झाली. दिल्ली आणि पवनच्या गावी राहिल्यानंतर लॉकडाऊन असल्यामुळे तिच्या पासपोर्ट (Passport) आणि व्हिसाचा (Visa) कालावधी संपला. या युवतीने ही बाब फिलिपीन्स दूतावासाला कळवली. त्यानंतर दुतावासातील अधिकाऱ्यांसोबत या युवतीस पाठवून देण्यात आले. तसेच यावेळी परदेशातून आलेल्या युवती बाबत तू प्रशासनाला माहिती का दिली नाही, अशी विचारणा करणारी नोटीस पवनला बजावण्यात आली.

First published:

Tags: Love story, Uttar pardesh