मराठी बातम्या /बातम्या /Viral /इंडोनेशियामध्ये सापडलं सोन्याचं बेट, नदीमधूनही बाहेर पडतंय सोनं!

इंडोनेशियामध्ये सापडलं सोन्याचं बेट, नदीमधूनही बाहेर पडतंय सोनं!

विश्वास बसणार नाही अशी अशक्य गोष्ट इंडोनेशियामध्ये घडत असल्याची जोरदार चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. इंडोनेशियात सोन्याचं चक्क एक संपूर्ण बेट (Island Of Gold Indonesia) सापडलं आहे.

विश्वास बसणार नाही अशी अशक्य गोष्ट इंडोनेशियामध्ये घडत असल्याची जोरदार चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. इंडोनेशियात सोन्याचं चक्क एक संपूर्ण बेट (Island Of Gold Indonesia) सापडलं आहे.

विश्वास बसणार नाही अशी अशक्य गोष्ट इंडोनेशियामध्ये घडत असल्याची जोरदार चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. इंडोनेशियात सोन्याचं चक्क एक संपूर्ण बेट (Island Of Gold Indonesia) सापडलं आहे.

    मुंबई, 3 नोव्हेंबर : पूर्वी भारताला सोन्याची चिमणी, असं म्हणलं जायचं. सोन्याच्या खाणी असलेलं प्रचंड समृद्ध शहर अस्तित्वात होतं का, असाही प्रश्न अनेकांना पडतो. सोन्याचा डोंगर किंवा सोन्याची नदी (Gold River) हे फक्त सिनेमातच घडू शकतं असं तुम्हाला वाटत असेल तर थोडं थांबा. हे प्रत्यक्षात घडलंय इंडोनेशियामध्ये. विश्वास बसणार नाही अशी अशक्य गोष्ट इंडोनेशियामध्ये घडत असल्याची जोरदार चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. इंडोनेशियात सोन्याचं चक्क एक संपूर्ण बेट ((Island Of Gold Indonesia) सापडलं आहे, असं म्हटलं जातं आहे.

    अनेक वर्षं गायब असलेल्या या बेटातून लोकांना आता सोन्याचे दागिने, अंगठ्या, बौद्ध मूर्ती आणि चीनमधली अत्यंत मूल्यवान अशी सिरॅमिकची भांडी मिळाली आहेत. इंडोनेशियाच्या पालमबँग प्रांतातील मुसी नदीमध्ये हे अनेक वर्षं गायब असलेलं ‘सोन्याचं बेट’ मिळालं आहे असं सांगितलं जात आहे. या जागेबद्दल अनेक लोककथा इथं प्रचलित आहेत. इथं माणसांना खाणारे साप राहतात, ज्वालामुखीचा उद्रेक होतो, हिंदीत बोलणारे पोपट इथं राहतात, अशा अनेक दंतकथा या जागेबद्दल सांगितल्या जातात.

    सोन्याचं बेट (Island Of Gold) या नावानं ओळखली जाणारी ही प्रसिद्ध जागा इंडोनेशियाच्या प्राचीन इतिहासात श्रीविजया शहराच्या नावाने ओळखली जात असे. पूर्वी हे एक अतिश्रीमंत, समृद्ध शहर होतं. या शहरावरूनच समुद्री व्यापारी मार्ग जात असे. जगाच्या पूर्व आणि पश्चिमेकडच्या व्यापारी राष्ट्रांना जोडणारं हे शहर होतं. हेच बेट मुसी नदीच्या तळाशी सापडल्याचं बोललं जात आहे. मलाकाच्या खाडीवर 600 ते 1025 या काळात राजांचं इथं साम्राज्य होतं. भारतातल्या चोल साम्राज्याशी झालेल्या युद्धामध्ये हे शहर उद्ध्वस्त झालं.

    पराभवानंतरही दोन दशकं इथं व्यापार सुरू होता असं इतिहासकारांचं म्हणणं आहे. 1390 मध्ये श्रीविजयन राज्याचा राजकुमार परमेश्वरानं आपलं साम्राज्य परत मिळवण्याचा प्रयत्न केला; पण शेजारच्या जावा राष्ट्रानं त्यांचा पराभव केला. त्यानंतर श्रीविजया चिनी डाकूंसाठी स्वर्गापेक्षा कमी नव्हतं. श्रीविजय शहराच्या सुवर्णदिवसांचे अवशेष आता मिळत नसले तरी मुसी नदीच्या तळाशी हे साम्राज्य असू शकतं असा इतिहासकारांचा दावा आहे. नदीच्या तळातून पाणबुड्यांना अनेकदा सोन्याचे दागिने, जुनी भांडी, मंदिराच्या घंटा,काही यंत्रं, नाणी, सिरॅमिकची भांडी आणि बौद्ध मूर्ती सापडल्या आहेत.

    आतापर्यंत या पाणबुड्यांना सोन्याच्या तलवारी, सोनं आणि माणकांच्या अंगठ्या, नक्षीदार जार, वाइन देण्यासाठी जग आणि मोराच्या आकाराची बासरी अशा वस्तू मिळाल्या आहेत. श्रीविजया शहराला शोधण्यासाठी सरकारच्या वतीनं नदीच्या आत किंवा नदीच्या परिसरात कोणत्याही प्रकारचं उत्खनन हाती घेण्यात आलं नाही असं पुरातत्त्व शास्त्रज्ञ सीन किंग्जले यांनी सांगितलं आहे. त्यामुळे या पाणबुड्यांना सापडलेल्या वस्तू त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या काही खासगी व्यक्तींना विकल्या आहेत. याचाच अर्थ इथं एखादं जुनं शहर अस्तित्वात असू शकतं. फक्त ते शोधण्याची गरज आहे.

    श्रीविजया शहरात लोक काय कामधंदा करत होते, कसे कपडे घालत होते, काय खात-पीत होते, कोणती भांडी वापरत होते, इतकं सोनं त्यांच्याकडे कसं आलं याबद्दल लोकांना माहिती नसल्याचं सीन किंग्जले यांनी सांगितलं. या शहरातलं सोनं नदीच्या तळाशी गाडलं गेलं आहे का, हे शहर निर्माण कसं झालं , उद्ध्वस्त कसं झालं याबद्लची काहीही ठोस माहिती उपलब्ध नाही. हे सगळं माहिती करून घेण्यासाठी इथं उत्खनन होणं गरजेचं आहे. त्यासाठी इंडोनेशियन सरकारची परवानगी घेणं आवश्यक आहे,. प्राचीन काळी इथं एक बंदर होतं असं पालेमबँगमध्ये झालेल्या उत्खननातून समोर आलं होतं; मात्र मंदिराचे नकाशे आणि पांडुलिपी वगळता त्यातून फार काही हाती लागलेलं नाही.

    10 व्या शतकामध्ये श्रीविजया शहरात बौद्ध मंदिर बनवण्यासाठी चीन आणि भारतानेही पैसे दिले होते असं फ्रान्समधील पुरातत्त्व शास्त्रज्ञ पिअरे ईव्स मॅग्विनने 2000 साली प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटलं आहे. चीनमुळे या शहरात संपत्तीची भर पडली होती. ऑस्ट्रेलियन नॅशनल सेंटर फॉर एक्सलन्स फॉर मेरिटाइम आर्किऑलॉजी या संस्थेनं 2019 मध्ये प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार श्रीविजया शहरानं व्यापार सुरू ठेवण्यासाठी चीनसह अन्य देशांशी हस्तिदंत, क्रिस्टलच्या मूर्ती, अत्तरं, मोती, गेंड्यांची शिंग आदी वस्तू दिल्या होता. श्रीविजया शहरात नैसर्गिक स्रोतांची कमतरता नव्हती. तिथं चंदनाची लाकडं, कापूर मुबलक उपलब्ध होते. त्याशिवाय सोन्याचं नैसर्गिक भांडार इथं होतं. काही जुने नकाशे सापडल्याचंही सांगितलं जातं.

    इतकं प्रचंड श्रीमंत, समृद्ध शहर आपल्या अस्तिवाचा कोणताही पुरावा मागे न सोडता अचानक गायब कसं होऊ शकतं हाच प्रश्न अनेकांच्या मनात आहे. श्रीविजया शहरातील घरं नदीवर लाकडी खांबांवर बांधली जात होती. घरंही लाकडी असायची असं इतिहासकारांचं म्हणणं आहे. इंडोनेशियाच्या काही भागांमध्ये आजही अशा प्रकारची घरं बघायला मिळतात. या घरांना पाहिल्यावर जणू पूर्ण शहर नदीवर तरंगतंय असा भास होतो. ही घरं कदाचित सडली, कुजली असतील आणि त्याचे काही खांबच किंवा प्लॅटफॉर्म अवशेष म्हणून शिल्लक राहिले असतील असाही अंदाज आहे. यापूर्वी 2011मध्ये मुसी नदीला पाणी कमी होतं. त्या वेळेस श्रीविजया शहर मुसी नदीबाहेर आलं होतं असं सांगितलं जातं.

    हल्ली मुसी नदीतून अनेक कंपन्या रेती उपसा करतात. हा उपसा करताना तळाशी गाडल्या गेलेल्या अनेक वस्तूही बाहेर येत आहेत. याच लालसेपोटी अनेक कंपन्या मध्यरात्रीच्या अंधारात नदीच्या तळाशी जाऊन तिथं काही वस्तू मिळतात का, याचा वारंवार शोध घेत आहेत. अनेकदा या पाणबुड्यांमुळे पोर्सेलिनपासून बनलेल्या कलाकृतींसारख्या कित्येक किमती, पण नाजूक वस्तू नदीच्या पाण्याच्या प्रवाहात तळाशीच तुटून जातात असं नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूरच्या साउथ इस्ट एशियन स्टडीजचे प्रोफेसर जॉन मिकसिक यांचं म्हणणं आहे. इथून तांब्याच्या बुद्धाच्या मूर्ती, काचेचे मणी, जुने शिक्के, वजनाची मापं अशा वस्तू मिळाल्या आहेत. या नदीच्या तळाशी असलेल्या प्राचीन संस्कृतीचे अवशेष चोरी होत आहेत, असं जॉन यांचं म्हणणं आहे.

    इथं साधारण 800 ते 1800 पर्यंत ही संस्कृती अस्तित्वात होती असा अंदाज तिथे मिळालेल्या तांब्याच्या भांड्यांच्या कार्बन डेटिंगवरून बांधला जात आहे. 2000 साली मुसी नदीच्या तळाशी सापडलेल्या 9 व्या आणि 10 व्या शतकामधील जहाजांच्या अवशेषांची इंडोनेशियानं आंतरराष्ट्रीय स्तरावर विक्री केली होती. तेव्हा इंडोनेशियाची अत्यंत नाचक्की झाली होती असं किंग्जले यांचं म्हणणं आहे. नवव्या शतकातील बेलीटंग जहाजाचे अवशेष एशियन सिव्हिलायझेशन म्युझियम ऑफ सिंगापूरनं खरेदी केले होते. सिरेबान या दहाव्या शतकातील जहाजाच्या अवशेषांचा इंडोनेशियन सरकारनं लिलाव केला होता. शेवटी आंतरराष्ट्रीय दबावामुळे हा लिलाव थांबवण्यात आला.

    एकूणच आपल्या ऐतिहासिक ठेव्यांना जपणं, त्याचं संवर्धन करणं ही प्रत्येक देशाची जबाबदारी असते. इंडोनोशियानेही जर श्रीविजया शहराच्या अस्तित्वाचे पुरावे देणारे अवशेष जतन केले, त्या दृष्टीने संशोधन, उत्खनन केले तर कदाचित प्राचीन संस्कृतीचा खूप मोठा खजिना हाती लागू शकतो.

    First published: