Home /News /viral /

103व्या वर्षी 14,000 फुटांवरून मारली उडी; जिगरबाज आजोबांच्या VIEDO चा सोशल मीडियावर धुमाकूळ

103व्या वर्षी 14,000 फुटांवरून मारली उडी; जिगरबाज आजोबांच्या VIEDO चा सोशल मीडियावर धुमाकूळ

म्हातारा इतुका न अवघे 103 वयोमान; उड्या मारण्यासाठी अजूनी लहान! खरंच हा VIEDO पाहून तुम्ही काय म्हणाल? जियो आजोबा!

    लंडन, 06 ऑक्टोबर: म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयामान. हे गाणं आपण ऐकलंच असेल. असंच काहीसं घडलं आहे लंडनमध्ये. तरुणांनाही थक्क करेल असा विक्रम ब्रिटनच्या अल्फ्रेड अल् बलास्के (Alfred Al Blaschke) या 103 वर्षांच्या आजोबांनी करुन दाखवला आहे. या आजोबांनी 14,000 फूट उंचीवरुन पॅरेशूटमधून उडी मारत विश्वविक्रम बनवला आहे. या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड (Guinness Book Of World Record) मध्ये करण्यात आली आहे. तसंच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या ट्विटर हँडलवरही या आजोबांचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. अशा प्रकारचा विक्रम बनवणारे अल्फ्रेड हे सर्वात जास्त वय असणारे व्यक्ती आहेत. विशेष म्हणजे त्यांचा हा विक्रम पाहण्यासाठी त्यांचं सगळं कुटुंब आणि मीडियाही तिथे जमला होता. अल्फ्रेड यांनी ताशी 120 मैलाच्या स्पीडमध्ये 14,000 फुटांवरुन उडी मारली आहे. या डायव्हिंगसाठी त्यांना 5 मिनिटांचा वेळ लागला. असे विक्रम बनवण्याची या आजोबांची ही काही पहिलीच वेळ नाही. 2017 मध्ये अल्फेड यांनी पहिल्यांदा स्कायडायव्हिंग केलं होतं. त्यावेळी त्यांचं वय 100 होतं. आजोबांनी या विक्रमानंतर त्याच दिवशी, असं धाडस पुन्हा करण्याची प्रतिज्ञा केली होती. आता त्यांनी आपली प्रतिज्ञा पूर्ण केली आहे. अल्फ्रेड अल् बलास्के यांच्या या विक्रमाकडे लोकं अक्षरक्ष: तोंडात बोटं घालून पाहतच राहिली. जे धाडस करायला धडधाकट तरुण माणसं घाबरतात तो विक्रम या 103 वर्षाच्या आजोबांनी मोडून काढला आहे. एवढ्यावरच ते थांबले नाहीत. तर “माझा नातू जेव्हा ग्रॅजुएशन पूर्ण करेल तेव्हा मी पुन्हा असाच विक्रम करेन.” असंही ते म्हणाले आहेत. अल्फ्रेड यांचा हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यांच्या धाडसाचं सगळेजण कौतुक करत आहेत.
    Published by:Amruta Abhyankar
    First published:

    Tags: London, World record

    पुढील बातम्या