Home /News /viral /

रेस्टोरंटने सर्व्ह केलं Stuffed Duck Neck, डिश पाहून ग्राहकाला बसला मोठा धक्का

रेस्टोरंटने सर्व्ह केलं Stuffed Duck Neck, डिश पाहून ग्राहकाला बसला मोठा धक्का

उत्तर लंडनमधील वेस्टर्न लाँड्री नावाच्या एका मासांहारी हॉटेलला Stuffed बदकाचं डोकं असलेली डिश ठेवल्याबद्दल संमिश्र रिव्ह्यू मिळाले. या हॉटेलमधील मेन्यूच्या सर्वांत महागड्या डिशमध्ये बदकाच्या डिशचा समावेश आहे.

नवी दिल्ली, 10 जानेवारी : जर तुमच्या हॉटेलच्या मेन्यूमध्ये बदकाचं डोकं आणि मान असलेली डिश आली तर तुम्ही काय कराल? यूकेची राजधानी असलेल्या लंडन शहरातील एका हॉटेलमध्ये असंच काहीसं चित्र पाहायला मिळालं. उत्तर लंडनमधील वेस्टर्न लाँड्री नावाच्या एका मासांहारी हॉटेलला Stuffed बदकाचं डोकं असलेली डिश ठेवल्याबद्दल संमिश्र रिव्ह्यू मिळाले. या डिशची किंमत तब्बल 18 पौंड एवढी आहे. ज्याची भारतीय रूपयातील किंमत 1,816.45 रुपये एवढी होते. भरलेली बदकाची मान असलेल्या डिशचा हा फोटो ट्विटरवर (Twitter) व्हायरल झाला. या वादग्रस्त डिशसोबतच हॉटेलच्या इन्स्टाग्राम (Instagram) पेजवर इतर डिशेसचे वेगळे फोटोही टाकण्यात आले आहेत. ज्यामध्ये मॅकरेल मासा, स्मोक्ड ईल, पॉलोक आणि कटल माश्यांच्या डिशेसचा समावेश आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या हॉटेलमधील मेन्यूच्या सर्वांत महागड्या डिशमध्ये बदकाच्या डिशचा समावेश आहे. आणखी एका महागड्या डिशमध्ये बदकाचा समावेश आहे. ज्याची किंमतही तब्बल 26 पौंडएवढी आहे.

हे वाचा - अभिमानास्पद! हाडं गोठवणाऱ्या थंडीत सैनिकांची गर्भवती महिलेसाठी 6.5 किमीची पायपीट

या डिशला पाहून एका इन्स्टाग्रामरने धक्का बसल्यामुळे लिहीलं आहे की, ‘हे जरा अतिच आहे’. तर याउलट इन्स्टाग्रामवरील एका शेफने यावर सोप्या शब्दात ‘स्वादिष्ट’ अशी कमेंट केली आहे.

हे वाचा - Viral होतोय सर्वात महागड्या मिठाईचा VIDEO, किंमत ऐकूनच भरेल पोट!

गार्डियन वृत्तपत्रानुसार (Guardian Newspaper), 2017 साली सुरू झालेल्या या हॉटेलला आत्तापर्यंत सकारात्मक रिव्ह्यूज मिळाले आहेत. दरम्यान, पदार्थांशी निगडीत अशाच अजब-गजब किश्श्यांमध्ये यूकेमधील एका केएफसी (KFC) ग्राहकाला असाच धक्का बसला. जेव्हा त्याच्या हॉट विंग्जच्या डब्यात संपूर्ण कोंबडीचं डोक, डोळे आणि चोच सोबत मिळालं होतं. ग्रॅबिएल नावाच्या महिलेने पार्सलसाठी ही ऑर्डर केली होती. तिने या ऑर्डरसाठी फूड डिलिव्हरी अॅपवर दोन स्टार देत आपला रिव्ह्यू लिहला. तिने लिहिलं की, माझ्या हॉट विंग्ज मिलमध्ये मला अख्खं डोक्यासकट तळलेलं चिकन आलं होतं. जे पाहून माझी जेवणाची इच्छाच गेली.
द सन वृत्तपत्रानुसार या महिलेने इंग्लंडच्या ट्विकेनहॅममधील केएफसी फॅल्टहॅम येथून ऑर्डर केलं होतं. इन्स्टाग्रामवरील टेकअवेट्रॉमा नावाच्या एका अकाउंटवर या महिलेचा रिव्ह्यू आणि फोटोसकट स्क्रीनशॉट शेअर करण्यात आला होता. जो खूपच व्हायरल झाला. काही युजर्सनी यावर राग व्यक्त केला, तर काहींनी याची खिल्ली उडवली.
First published:

Tags: Viral photo

पुढील बातम्या