मराठी बातम्या /बातम्या /Viral /धावत्या ट्रेनसमोर अचानक आाला हत्तींचा कळप; मग पुढे काय घडलं पाहा..Video

धावत्या ट्रेनसमोर अचानक आाला हत्तींचा कळप; मग पुढे काय घडलं पाहा..Video

धावत्या ट्रेनसमोर अचानक आाला हत्तींचा कळप

धावत्या ट्रेनसमोर अचानक आाला हत्तींचा कळप

सध्या सोशल मीडियावर इथल्या जंगलाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये हत्तींचा कळप ट्रेनसमोर येतो अन्...

नवी दिल्ली 25 मे : तांडा रेंजमधून जाणाऱ्या रेल्वे ट्रॅकवर हत्तींचा कळप पाहून ट्रेन थांबल्याची घटना समोर आली आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये हत्ती रेल्वे ट्रॅक ओलांडून जंगलाच्या पलीकडे जाताना दिसत आहेत. तांडा रेंजच्या जंगलातून जाणारा रेल्वे मार्ग हत्तींसाठी धोकादायक मानला जातो.

आतापर्यंत अनेक हत्ती रेल्वे रूळ ओलांडताना अपघाताचे बळी ठरले आहेत. सध्या सोशल मीडियावर इथल्या जंगलाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये हत्तींचा कळप ट्रेनसमोर येतो. हत्तींना पाहून लोको पायलट ट्रेन थांबवतो. हत्तींनी ट्रॅक ओलांडल्यानंतर ट्रेन पुन्हा धावू लागते.

Viral Video : भयानक प्राण्याचा शेळीवर हल्ला, शिकारीचा थरार कॅमेऱ्यात कैद

वन विभागाने लोको पायलटसह मोहीम सुरू केली : तराई केंद्रीय वन विभागाच्या कर्मचार्‍यांनी हत्तींना रेल्वे अपघातांपासून वाचवण्यासाठी मोहीम सुरू केली होती. यामध्ये वनकर्मचाऱ्यांनी तांडा रेल्वे मार्गावर ट्रेन चालवणाऱ्या 40 लोको पायलटना हत्तींच्या हालचालीचे 11 पॉईंट दाखवले आणि या पॉईंट्सवर ट्रेनचा वेग कमी ठेवण्याची विनंती केली.

रुद्रपूर वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, तांडा रेल्वे मार्गावर रेल्वे अपघातात दरवर्षी सरासरी दोन हत्तींचा मृत्यू होतो. त्यांच्या म्हणण्यानुसार, तांडा जंगलात गेल्या पाच वर्षांत 10 हत्तींना रेल्वे अपघातात जीव गमवावा लागला आहे. लोको पायलटला 11 पॉईंट दाखवले गेले होते. हल्दवानी-तांडा जंगलात हत्तींना रस्ता देण्याचं कौतुकास्पद काम लोको पायलटनं केलं आहे. यामुळे रेल्वे आणि वन विभाग यांच्यातील परस्पर समन्वय वाढेल.

First published:
top videos

    Tags: Elephant, Train, Videos viral