मुंबई, 06 मे : कोरोनाशी लढण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. आतापर्यंत दोन वेळा लॉकडाऊन वाढवण्यात आला. यात पहिल्या दोन लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. मात्र, तिसऱ्या लॉकडाऊनमध्ये सूट देण्यात आली आहे. देशात कोरोनाच्या प्रादुर्भावानुसार तीन झोन तयार करण्यात आले असून रेड झोन वगळता इतर ठिकाणी थोडी सूट देण्यात आली आहे.
गेल्या दोन दिवसांत दारूची दुकाने सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यानंतर दारुच्या दुकानांसमोर लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र दिसलं. यातील अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. यातच एका परदेशी महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. यामध्ये महिला होम मेड वाइनची बॉटल उघडताना दिसत आहे. मात्र यावेळी घडलेल्या एका प्रकारामुळे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहिला जात आहे.
ट्विटरवर एका युजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याने म्हटलं आहे की, होम मेड वाइन बॉटल उघडण्याआधी पूर्णपणे फर्मेन्टड असल्याची खात्री करून घ्या.
Always make sure your homemade wine has fully fermented before opening... pic.twitter.com/WGKab8sdQo
— Rex Chapman🏇🏼 (@RexChapman) May 5, 2020
व्हिडिओत दिसतं की, महिला रेकॉर्डिंगवेळी सांगते की ती वाइनची बॉटल उघडत आहे. मात्र जशी ती बाटलीचं टोपण काढते तेव्हा गोळी झाडल्यासारखा आवाज होतो आणि बाटलीतील वाइन छतापर्यंत वर उडते. महिलेच्या अंगावरही वाइन पडल्याचं दिसत आहे. सोशल मीडियावर आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.
हे वाचा : 'अशी पुढे जाणार अर्थव्यवस्था', आनंद महिंद्रांनी शेअर केला ट्रॅक्टरचा जुगाड VIDEO