सोशल डिस्टन्सिंगचा असा जुगाड भारतातच होऊ शकतो, पाहा VIDEO

कोरोनावर अद्याप कोणतेही औषध किंवा लस उपलब्ध नसल्यानं त्यावर सोशल डिस्टन्सिंग हाच एकमेव उपाय आहे.

कोरोनावर अद्याप कोणतेही औषध किंवा लस उपलब्ध नसल्यानं त्यावर सोशल डिस्टन्सिंग हाच एकमेव उपाय आहे.

  • Share this:
    मुंबई, 07 मे : जगभरात कोरोना व्हायरसनं धुमाकूळ घातला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सध्यातरी कोणतंच औषध किंवा लस उपलब्ध नाही. जगातील अनेक देश यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. तिथे आतापर्यंत 75 हजारांहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाशी लढण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग हाच एकमेव उपाय सध्या आहे. त्यामुळे अनेक देशांनी लॉकडाऊनही केलं आहे. भारतातही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 24 मार्चपासून लॉकडाऊन कऱण्यात आलं आहे. आतापर्यंत दोन वेळा लॉकडाऊन वाढवलं असून 17 मेपर्यंत करण्यात आलं आहे. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात भारतात सोशल डिस्टन्सिंगचे अनेक जुगाड बघायला मिळत आहेत. याआधीही बाइकवरून दोघं जाताना केलेला जुगाड किंवा लग्नावेळी काठीने वरमाला गळ्यात घातल्याचे प्रकार घडले आहेत. आताही असाच एक जुगाड दुध विकणाऱ्याने केला आहे. त्यानं ग्राहकांना दुध देताना जास्त अंतर रहावं यासाठी खास जुगाड केला आहे. गाडीला एक पाइप जोडून त्यातून ग्राहकाच्या भांड्यात दूध घालत असल्याचं व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसतं. याशिवाय इतरही अनेक जुगाड सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एका तरुणाने तर आपल्या चारही बाजुला अंतर राहील यासाठी लोखंडी स्टँड तयार करून गळ्यात अडकवलं. त्याच्यावर हाताच्या आकारात कापलेल्या कागदी बोर्डावर डिस्टन्सिंगबाबत मेसेज लिहिला आहे. पाहा VIDEO : एका मिनिटासाठी संपूर्ण शहर 'धुळी'स मिळालं, पाहा निसर्गाचं रौद्र रुप
    First published: