मराठी बातम्या /बातम्या /Viral /

हजाराची पैज जिंकण्यासाठी केली माकडाची दाढी, VIDEO VIRAL

हजाराची पैज जिंकण्यासाठी केली माकडाची दाढी, VIDEO VIRAL

एक माणूस केस कापणाऱ्याला चॅलेंज देतो की जर तो माकडाची दाढी करेल तर त्याला एक हजार रुपये देईल. तेव्हा न्हाव्यानं माकडाची दाढी केली.

    पटना, 13 मे : कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊन कऱण्यात आलं आहे. अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त इतर सेवा बंद आहेत. यामुळे रोजीरोटीचा प्रश्नही निर्माण झाला आहे. कोरोनाच्या या संकटकाळात एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एक न्हावी माकडाची दाढी करत असल्याचं दिसतं. लॉकडाऊनच्या काळात त्यांचेही काम बंदच आहे. सलून बंद असल्यानं त्यांच्याही हाताला काम नाही. यातच एक माणूस केस कापणाऱ्याला चॅलेंज देतो की जर तो माकडाची दाढी करेल तर त्याला एक हजार रुपये देईल. तेव्हा न्हाव्यानं माकडाची दाढी केली. माकडही दाढी होईपर्यंत गप्प बसले होते. बिहारमधल्या समस्तीपूर इथली ही घटना असल्याचं म्हटलं जात आहे. एक माणूस सलूनवाल्याकडे आला आणि त्यानं पाळीव माकडाची दाढी करण्यास सांगितलं. त्या माणसानं माकडाची दाढी करण्याचं चॅलेंज दिलं. माकडाची दाढी केल्यास हजार रुपये देईन असं तो म्हणाला. सलूनवाल्यानं यातून पैसे मिळतील म्हणून चॅलेंज स्वीकारलं. चॅलेंज स्वीकारताच सलूनवाल्यानं माकडाची दाढी करायला सुरुवात केली. याचा व्हिडिओ त्याठिकाणी उभा असलेल्या काही लोकांनी शूट केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात दिसतं की माकडही आरामात दाढी करून घेत आहे. यावेळी माकड पूर्ण शांत बसल्यानं लोकांनाही आश्चर्य वाटत आहे. हे वाचा-4 वर्षांच्या चिमुरड्यानं केली ट्रम्प यांची नक्कल, VIDEO पाहून बसणार नाही विश्वास हे वाचा-लॉकडाऊनमध्ये खाण्याच्या शोधात चक्क झाडावर चढला हत्ती आणि...पाहा VIDEO
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Social media, Viral videos

    पुढील बातम्या