Home /News /viral /

VIDEO : 'अपना टाइम आयेगा' लिहिलेला टी शर्ट घालून घराबाहेर पडला, पोलिसांना दिसताच काय झालं पाहा

VIDEO : 'अपना टाइम आयेगा' लिहिलेला टी शर्ट घालून घराबाहेर पडला, पोलिसांना दिसताच काय झालं पाहा

कोरोनाला रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आलं असलं तरीही काही लोक याचं उल्लंघन करत घराबाहेर पडताना दिसत आहेत.

    मुंबई, 07 मे : कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारतात 17 मेपर्यंत लॉकडाऊन करण्यात आलं आहे. याकाळात लोकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहनही केलं आहे. मात्र तरीही काही लोक घरातून बाहेर पडत आहे. लॉकडाऊनचं उल्लंघन कऱणाऱ्या लोकांवर पोलीस कठोर कारवाई करत आहेत. पोलिसांनी अशा लोकांवर केलेल्या कारवाईचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यात असा एक व्हिडिओ आहे ज्यामध्ये पोलीस अनोख्या पद्धतीनं शिक्षा देताना दिसतात. त्यांचा हा अनोखा अंदाज लोकांनाही आवडला आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ पोलीस कर्मचारी भागवत प्रसाद पांडे यांचा आहे. यात पांडे घराबाहेर फिरत असणाऱ्या व्यक्तीजवळ जाताना दिसतात. त्या व्यक्तीच्या टी शर्टवर अपना टाइम आयेगा असं लिहिलेलं असतं. ते पाहून म्हणतात की, तेरा टाइम आ गया. यानंतर संबंधित व्यक्तीला समज देऊन पांडे यांनी घरी पाठवलं. युट्यूबवर हा व्हिडिओ  शेअर केला आहे. व्हिडिओला कॅप्शन देताना म्हटलं आहे की, तुम्ही घरातच रहा आणि लॉकडाऊनचं पालन करा. ते तुमच्या आणि देशाच्या हिताचं आहे. देशात कोरोनाला रोखण्यासाठी तिसऱ्यांदा लॉकडाऊन वाढवण्यात आलं आहे. हे लॉकडाऊन 17 मे पर्यंत असून या काळात काही प्रमाणात सूटही देण्यात आली आहे. आतापर्यंत देशात 52 हजार कोरोना रुग्ण आढळले आहेत. गेल्या तीन दिवसात कोरोनाचे 10 हजार रुग्ण वाढले आहेत. पाहा VIDEO : एका मिनिटासाठी संपूर्ण शहर 'धुळी'स मिळालं, पाहा निसर्गाचं रौद्र रुप
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या